रत्नागिरीमध्ये 5 वर्षाच्या मुलींसोबत घेतला होता सहभाग
गुहागर, ता. 31 : रत्नागिरी जिल्हा जलतरण असोसिएशन आणि ऍकवा टेकनिकस स्विमिंग अकादमी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये दोन वर्ष तीन महिने वयाच्या समर्था रुचिरा साईप्रसाद साळवी या चिमुकलीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. 5 वर्षीय वयोगटातील मुलींसोबत या स्पर्धेमध्ये उतरली होती. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. Samartha came second in the swimming competition

शासकीय जलतरण तलाव साळवस्टॉप येथे 25 डिसेंबर रोजी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे 120 स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. वय वर्ष 5 वयोगटातील मुलींसोबत तिने सहभाग नोंदवला. सर्वात कमी वयाची म्हणजे सव्वा दोन वर्ष वयाची समर्था रुचिरा साईप्रसाद साळवी आपल्यापेक्षा जादा वयाच्या मुलींना मागे टाकत हे यश मिळवले. समर्थाला विवेक विलणकर यांनी पोहण्याची शिकवण दिली. विवेक विलणकर यांनी तिच्याकडून तब्बल 5 महिने पोहण्याचा सराव करून घेतला. पाऊस असो व थंडी समर्थाने न चुकता पोहण्याचा नियमित सराव करून यश संपादन केले. तिच्या या यशामध्ये तिला मार्गदर्शन करणारे विलणकर यांचा मोठा वाटा आहे. Samartha came second in the swimming competition
