नेरुळमध्ये नव्या शाखेचे 27 नोव्हेंबरला उद्घघाटन
गुहागर, ता. 25 : कोकणातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या आणि ग्राहकांना उत्तम सेवा देणाऱ्या श्री समर्थ नागरी सह. पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेच्या नेरूळ, नवी मुंबई येथे सुरू होणाऱ्या नव्या शाखेचा शुभारंभ दि. २७ नोव्हेंबर रोजी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रभाकर विठ्ठल आरेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
श्री समर्थ भंडारी नागरी सह. पतसंस्था रत्नागिरी जिल्ह्यात पारदर्शक व्यवहार आणि व्यावसायिकता जपत पतसंस्थेने आपला नावलौकिक निर्माण केला आहे. सर्वसामान्य नागरिक आपली हक्काची पतसंस्था म्हणून या संस्थेकडे पाहतो. आपल्या आर्थिक सक्षमते बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत सभासदांच्या हिताला प्राधान्य व ठेवीदारांनाही त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त मोबदला संस्था देत आहे. आर्थिक स्पर्धेच्या या युगात अर्थकारणाची गती राखण्याचं आव्हान संस्था पेलत आहे. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत, आपल्या अर्थकारणात व्यावसायिकता आणि सहकारतत्त्व यांची सांगड घालून पतसंस्था विस्ताराच्या दिशेने मार्गाक्रमण करत आहे.
संस्थेच्या नेरूळ येथील शाखेच्या शुभारंभ प्रसंगी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. सकाळी ११ ते सायं. ६ या वेळेत तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
