• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पारदर्शक आणि विश्वासार्हता जपणारी

by Ganesh Dhanawade
November 6, 2022
in Guhagar
30 1
1
Samath Bhandari Patsanstha

Samath Bhandari Patsanstha

60
SHARES
171
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण

गुहागर : सहकार हा भारतीयांचा उपजत गुण आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आर्थिक देवाण-घेवाण करण्याचा प्रघात आपल्याकडे पूर्वीपासून आढळून येतो. ‘भिशी’ या लोकप्रिय प्रकाराला आर्थिक सहकारच म्हणता येईल. याच संकल्पनेतून नागरी सहकारी पतसंस्था, आर्थिक संस्था, बँका उदयास आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पारदर्शक आणि विश्वासार्हता जपणारी पतसंस्था म्हणून श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (Shree Samarth Bhandari Nagari Patsanstha Ltd.) चिपळूण या संस्थेचे नाव घेतले जाते. या संस्थेच्या मंडणगड येथील १६ व्या शाखेचा उद्घाटन सोहळा आज दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांचे शुभ हस्ते स्टेट बँक ऑफ इंडिया इमारत, पहिला मजला, बाणकोट रोड मंडणगड ता. मंडणगड, जि. रत्नागिरी येथे संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने या संस्थेविषयी थोडक्यात घेतलेला आढावा…..
श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., चिपळूण या पतसंस्था रत्नागिरी जिल्हयातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकीक प्राप्त केला आहे. या संस्थेची स्थापना १३ जून २००२ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रभाकर वि. आरेकर यांनी केली. पाच जिल्हयांसह संपूर्ण कोकण विभाग कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेने विश्वासार्ह पतसंस्था म्हणून संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये नावलौकिक कमावला आहे. संस्थेला प्रगतीपथावर नेण्याचे काम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रभाकर वि. आरेकर यांनी आपले सहकारी संचालक यांचे सहकार्याने केले आहे.
सुरक्षितता, विश्वासार्हता, पारदर्शकता व व्यावसायिकता या प्रमुख तत्वांवर संस्थेचे कामकाज सुरू असून त्यामुळे सभासद व ठेवीदार यांचा विश्वास संपादन करण्यात संस्था यशस्वी ठरली आहे. संस्थेच्या कार्यक्षेत्रात प्रधान कार्यालयासह एकुण 15 शाखा व 3 ठिकाणी कलेक्शन सेंटर कार्यरत आहेत. संस्थेची १६ वी शाखा मंडणगड सुरू करण्यात येत आहे.Samarth Bhandari Nagari Patsanstha
संस्थेच्या सभासद, ग्राहक व ठेवीदार यांचे हिताचे रक्षण करणे आवश्यक असून संस्थेने ठेवीदारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च्य प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे संस्थेच्या ठेवींमध्ये सतत वाढ होत आहे. संस्थेचा कारभार पारदर्शक असल्यामुळे संस्थेच्या सभासद, ठेवीदार व ग्राहक यांना संस्थेबद्दल विशेष प्रेम व आपुलकी निर्माण झालेली आहे. कोणत्याही संस्थेचा आर्थिक पाया मजबूत असणे आवश्यक असून त्यादृष्टीने संस्थेने सुरूवातीपासुनच नियोजनबध्द कामकाज केलेले आहे. स्थापनेपासुनच पतसंस्था नफ्यात असून संस्थेला सतत ऑडीट वर्ग ‘अ’ प्राप्त झालेला आहे. संस्थेने भागभांडवल, ठेवी, कर्जव्यवहार, निधी, निव्वळ नफा व गुंतवणूका या सर्वच आर्थिक बाबीमध्ये प्रगती केली आहे. तसेच कर्जवसुली, एनपीए, सिडी रेश्यो या निकषांचे तंतोतंत पालन केलेले आहे. Samarth Bhandari Nagari Patsanstha
संस्थेच्या कामकाजाचे मुल्यमापन करून संस्थापक अध्यक्ष मा. प्रभाकर आरेकर यांना नुकतेच सन २०२१ / २०२२ साठी सकाळ माध्यम समूहाच्या “बेस्ट चेअरमन” आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे कामकाज ऑनलाईन संगणक प्रणालीव्दारे सुरू करण्यात आले असून आर.टी.जी.एस / एन.ई.एफ.टी. व क्यूआर कोड या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. संस्थेमध्ये पूर्वीपासून सभासद व ग्राहक यांना बँकिगच्या सर्व सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये एटीएमव्दारे पैसे काढण्याची सोय, मनी ट्रान्सफर, अॅटपार चेक, चेक कलेक्शन, विजबील भरणा केंद्र, या सेवांचा समावेश आहे. संस्थेमध्ये विविध प्रकारच्या ठेवीवर आकर्षक व्याजदर देण्यात येत असून संस्थेमध्ये सर्व प्रकारच्या कर्जयोजना उपलब्ध आहेत. पतसंस्थेकडे एकूण सध्या ४३ कर्मचारी कार्यरत आहेत. मंडणगड शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंडणगड व परिसरातील सर्व सभासद ग्राहक, ठेवीदार यांनी संस्थेच्या या सर्व सेवा सुविधांचा लाभ घेवून संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रभाकर आरेकर व संचालक मंडळ यांनी केले आहे. Samarth Bhandari Nagari Patsanstha

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSamarth Bhandari Nagari Patsansthaटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share24SendTweet15
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.