गुहागर तेलीआळी श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर पटांगण
गुहागर, ता.14 : तेलीआळीतील श्री संताजी मंडळ गुहागर तेलीवाडी यांच्यावतीने श्री भैरी व्याघ्रांबरी देवी पालखी उत्सव (समा) उत्सव घेण्यात आला. हा उत्सव श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर पटांगणामध्ये उत्साहात संपन्न झाला. Sama of Shri Bhairi Vyaghrambari Devi
या कार्यक्रमामध्ये सायंकाळी लॉटरी पद्धतीने नंबर काढण्यात आले. नंतर उपस्थिती नुसार प्रत्येक गावाला नंबर देण्यात आले. त्यानंतर श्री संताजी मंडळ गुहागर तेलीवाडी यांच्या वतीने पालखी नाचविण्याचा कार्यक्रम पार पडला. रात्री दहा वाजता मुख्य लोटण्याचा कार्यक्रम सुरू झाला. Sama of Shri Bhairi Vyaghrambari Devi
यामध्ये मधुकर गावणंग आणि मंडळी वेळणेश्वर, दुर्गादेवी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष कल्पेश जांगळी, किर्तन वाडी ग्रामस्थ मंडळ राजेंद्र अर्जुन भागडे आणि मंडळी, अविनाश कावणकर आणि मंडळी असगोली, नवलाई ग्रामस्थ मंडळ हेदवी, सुंकाई देवी देवस्थान यशवंत धावडे मंडळी अडूर, श्री व्याघ्रांबरी ग्रामस्थ मंडळ नरवण, हेमंत तिवरेकर आणि मंडळी वेळणेश्वर, अनंत माईन आणि मंडळी साखर आगर, दुर्गादेवी ग्रामस्थ मंडळ दिपक जांगळे आणि मंडळी आदी गावे या समा कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या समा उत्सव मध्ये भवानी लोटणीचा मान कुणाल प्रदीप वेसविकर यांना मिळाला. तर सुरुवातीचे पाच लोटी म्हणून ऋषिकेश रहाटे, प्रथमेश रहाटे, प्रसाद बोले, वल्लभ वेस्विकर यांना होता. मुख्य लोटी म्हणून विशाल अरुण रहाटे व शेवटचे लोटी म्हणून केदार मालप, गणेश रहाटे, राकेश बोले, सुधीर फडतरे हे होते. Sama of Shri Bhairi Vyaghrambari Devi
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संताजी मंडळ तेलीवाडी चे अध्यक्ष अरुणशेठ रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ मंडळ तसेच महिला मंडळ, मुंबई मंडळ, युवक मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले. Sama of Shri Bhairi Vyaghrambari Devi
