• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतन वाढले

by Mayuresh Patnakar
August 19, 2023
in Maharashtra
684 7
1
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतन वाढले
1.3k
SHARES
3.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरोग्य मंत्री तानाजी सावंत, संघटनेच्या प्रयत्नांना यश

Guhagar News, ता. 16 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या वेतनात 5 टक्के वाढ (Salary of CHO increased) होणार आहे. याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवले आहे. गेले वर्षभर अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेतर्फे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.Salary of CHO increased

मार्च 2019 मध्ये आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमात वैद्यकिय शिक्षण पूर्ण झालेल्यांना विशेष प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रात नियुक्त करण्यात आले. आज महाराष्ट्रात 8 हजार 500 हून अधिक समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. सदरचे पद कंत्राटी पध्दतीचे असल्याने पहिल्या वर्षी रु. 25 हजार मासिक वेतन Salary आणि दरवर्षी मुळ वेतन रक्कमेत 5 टक्के वाढ केली जाईल असा करार करण्यात आला होता. मात्र 2019 नंतर कोणत्याच समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला गेल्या 4 वर्षात वेतन वाढ मिळाली नाही. Salary of CHO increased

Salary of CHO increased
Salary of CHO increased

Salary of CHO increased

याबाबत अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. दत्ता मुळे यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसोबत  आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली. वेतनवाढीसह समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची विनंती केली. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी या संघटनेच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकार, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवी दिल्ली यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यातुन 2005 पासून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदलीचा विषय मार्गी लागला. त्यामुळे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना म्युच्युअल ट्रान्सफरचा नियम लागू झाला. तसेच  वार्षिक वेतनवाढीचा निर्णयही राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अधिकाऱ्यांनी घेतला. राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये सन 2019 व त्यानंतर भरतील झालेल्या व सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांना वार्षिक वेतनवाढ व मागील वेतनवाढीतील देय फरकाची रक्कम देण्याचे कळवीले आहे. Salary of CHO increased

या निर्णयाबाबत अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. दत्ता मुळे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले आहेत. ४ वर्ष वेतनवाढीचा निर्णय रखडल्यामुळे शहरापासून दूर ग्रामीण भागात कंत्राटी पध्दतीने आरोग्य सेवा करणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्याचे मानसिक खच्चीकरण झाले होते. पहिल्या बॅचमधील काहींनी हे काम सोडून स्वत:चा वैद्यकिय व्यवसाय सुरु केला. मात्र आता वेतनवाढ व बदलीबाबतचा निर्णय झाल्याने हे कंत्राटी डॉक्टर नव्या उर्जेने काम करतील. अशी प्रतिक्रिया डॉ. मुळे यांनी व्यक्त केली आहे. Salary of CHO increased

Tags: Dr. Tanaji SawantGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSalary of CHO increasedआरोग्य मंत्री तानाजी सावंतटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share537SendTweet336
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.