मनसे उपजिल्हाध्यक्ष अध्यक्ष श्री विनोद जानवळकर यांनी केला सन्मान
गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत अली पब्लिक स्कूल शृंगार तळी शाळेचा साईम सरफराज मालगुंडकर यांनी दोन सिल्वर पथक पटकावले आहेत. या स्पर्धेमध्ये गुहागर चिपळूण रत्नागिरी, खेड, पुणे ,अमरावती, मुंबई आदी ठिकाणाहून स्पर्धेत स्पर्धक सहभागी झाले होते. साईम माळगुंडकरच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष श्री विनोद गणेश जानवळकर यांनी सन्मान करुन भेट वस्तू देत कौतुक केले आहे.Saim’s success in kickboxing competition

साईम मालगुंडकर याने ४२ किलो वजनी गटात लाईट कॉन्टॅक्टमध्ये सिल्वर पदक व किक लाईट मध्ये सिल्वर पदक असे दोन पदक पटकावले आहेत. साईम हा अली पब्लिक स्कूल मध्ये आठवी इयत्तेत शिकत आहे. याला हुजेफा ठाकूर यांनी प्रशिक्षण दिले आहे. तर महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष योगिता खाडे यांचे मार्गदर्शन लाभले. साईम माळगुंडकरने केवल शाळेचे नव्हे तर जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उंचावले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील हल्लनकर, जानवळे उपसरपंच सौ वैभवी विनोद जानवळकर, मनसे विभाग अध्यक्ष विश्वजीत पोद्दार शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर मुख्याध्यापक शार्दुल सर, शाळा व्यवस्थापन संदिप कोडविलकर विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. Saim’s success in kickboxing competition