गुहागर, ता. 04 : तालुक्यातील मासू येथील खलाशाचा समुद्राच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना साखरतर येथे घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 9 ते शनिवार 2 एप्रिल या कालावधीत घडली आहे. Sailor Dies at Sakhartar
मासू गावातील साखरतर येथील बोटीवर विलास रुपाजी मास्कर हे मच्छिमारीचे काम करत होते. शुक्रवारी रात्री 9 वाजता विलास मास्कर हा सचिन पोमेंडकर यांच्या घरी जेवन झाल्यावर साखरतर येथे बोटीवर झोपण्यासाठी गेला होता. परंतू शनिवारी सकाळी 5 वा. पोमेंडकर यांना विलास बोटीवर दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली, असता काही वेळाने त्यांना दुसऱ्या एका बोटीजवळ पाण्यात विलास दिसून आला. यानंतर त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. Sailor Dies at Sakhartar
विलास रुपाजी मास्कर (वय 32, रा. मासू गुहागर, रत्नागिरी ) असे खलाशाचे नाव आहे. हा खलाशी झोपेत असताना समुद्राच्या पाण्यात पडला असावा, याबाबत सचिन तुकाराम पोमेंडकर (वय 58, राहणार कासारवेली, रत्नागिरी ) यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. Sailor Dies at Sakhartar