गुहागर, ता. 30 : जागतिक पातळीवर सायकलिंग या विषयाला नवसंजीवनी प्राप्त करुन देण्यासाठी झटणाऱ्या Audax Club Perisien (France) या संस्थेचे भारतात Audax India Randonneurs (AIR) ही संघटना प्रतिनिधित्व करते. या दोन्ही संस्थांनी चिपळूण सायकलिंग क्लबच्या माध्यमातून Sahyadri Randonneurs या क्लबला अधिकृत मान्यता दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील रायडर्सना आपल्या हक्काचा Audax Club प्रदान केला आहे. Sahyadri Randonneurs Club


Sahyadri Randonneurs च्या स्थापनेनंतर उद्घाटनपर पहिला इव्हेंट दि.03 जुलै 2022 रोजी घोषित करण्यात आला आहे. सकाळी 6.30 वाजता सुरु होणाऱ्या या इव्हेंटमधे साडेसात तासात शंभर किमी अंतर पार करायचे आहे. हा प्रवास चिपळूण – गणेशखिंड – सावर्डे – धामणी – कर्णेश्वर मंदीर, कसबा परतीच्या प्रवासात सावर्डे, कामथे मार्गे चिपळूण या मार्गाने पूर्ण करणे अपेक्षित आहे. यासाठी इच्छुक रायडर्सना प्रथम Audax क्लबचे सभासदत्व घेऊन सदर इव्हेंटला रजिस्टर करावे लागते. सदर इव्हेंटबाबत खालील लिंकचा वापर करुन रजिस्ट्रेशन करता येईल. (https://www.audaxindia.in/event-e-6663) या इव्हेंटमधे 18 वर्षावरील कोणीही व्यक्ती यात सहभागी होऊ शकते. आज अखेरपर्यंत 30 रायडर्सनी आपला सहभाग नोंदवला आहे. सदर इव्हेंटच्या रजिस्ट्रेशनची अखेरची तारीख 01 जुलै आहे. रजिस्ट्रेशन व इतर माहितीसाठी श्री. मनोज भाटवडेकर (9421253153) व श्रीनिवास गोखले (9881770741) यांचेशी संपर्क करावा, असे सह्याद्री रँडोनिअर्सतर्फे कळवण्यात येत आहे. Sahyadri Randonneurs Club


ठराविक कालमर्यादेत 100, 200 ते 1200 किमीच्या राईड्स करणे, त्या स्वहिमतीवर पूर्ण करणे म्हणजेच रँडोनिअरींग. भारतातील विविध क्लबकडून घोषित होणाऱ्या इव्हेंट्ससाठी आजवर पुणे, मुंबई, सांगली, सावंतवाडी अशा लांबवरच्या ठिकाणी जाऊन सदर इव्हेंट्स पूर्ण करावे लागत होते. मात्र सह्याद्री रँडोनिअर्स, चिपळूणच्या स्थापनेमुळे आणि Audax च्या मान्यतेमुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील रायडर्सना फार मोठी सोय उपलब्ध झालेली आहे. Sahyadri Randonneurs Club

