• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्ष पदी साहिल आरेकर

by Ganesh Dhanawade
June 20, 2025
in Guhagar
119 1
0
Sahil Arekar as NCP Taluka President
233
SHARES
665
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कमी वयात पक्षाने सोपवली महत्वाची जबाबदारी, सर्वांनाच सोबत घेऊन संघटना मजबूत करणार

गुहागर, ता. 20 : अजित पवार गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी श्री. साहिल प्रदीप आरेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून आरेकर यांचे अभिनंदन करण्यात येतं आहे. तसेच कमी वयात सत्तेतील एका राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष पद भूषवण्याची संधी मिळाली आहे. Sahil Arekar as NCP Taluka President

या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.बाबाजीराव जाधव यांनी श्री. आरेकर यांना दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष श्री. श्रीधर बागकर, राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर शहराध्यक्ष श्री.मंदार कचरेकर , राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हा सचिव सौ. मनाली आरेकर,  महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.शलाका काष्टे, राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर तालुका खजिनदार श्री. दीपक शिरधनकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुका सेक्रेटरी सौ. ऋशाताई ठाकरे आदी उपस्थित होते. Sahil Arekar as NCP Taluka President

साहिल आरेकर यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेच्या माध्यमातून आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवातीला केली. गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती आणि ज्यांनी तालुक्यात सहकारचे जाळे निर्माण केले ते कै. सदानंद आरेकर यांचे नातू आहेत. राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. सन २०१२ ते २०१४ मध्ये  त्यांनी गोगटे महाविद्यालय रत्नागिरी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉलेज कमिटी अध्यक्ष, त्यांनतर २०१६ ला राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेस  रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, त्यांनतर २०१८ पासून 2022 पर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पद, 2023 पासून राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे. तसेच गुहागरमध्ये आमदार श्री.भास्कर जाधव यांच्या सेना प्रवेशावेळी श्री. विक्रांत जाधव यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून श्री. साहिल आरेकर यांची ओळख असताना  त्यांनी शिवसेनेत प्रवेश न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच रहाण्याचा निर्णय घेतला. गेली अनेक वर्षे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी सेलचे प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. रत्नागिरी मध्ये असताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बहर कार्यक्रमातून राजकारणात सक्रिय झाले होते. Sahil Arekar as NCP Taluka President

Minor girl kidnapped from Ratnagiri

लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्व निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे पक्ष संघटन मजबूत करून आपला पक्षाचा उमेदवार भरघोस मतांनी निवडून यावा. यासाठी ते नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता केवळ पक्ष संघटना म्हणून काम करत असताना पक्षानेच त्यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. अत्यंत कमी वयात राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा पक्ष असलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुहागर तालुकाध्यक्ष पदाची धुरा पक्षाने त्यांच्याकडे सोपवली आहे. साहिल आरेकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. Sahil Arekar as NCP Taluka President

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSahil Arekar as NCP Taluka Presidentटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share93SendTweet58
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.