खाजगी पंपावर भरतात इंधन, 15 ते 16 रू. बचत
गुहागर, ता. 28 : तेल कंपनीसोबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडऴने केलेला डिझेल करार संपला आहे. त्यामुळे एसटी आगाराला स्वस्त दरात डिझेल उपलब्ध होत नाही परिणामी एसटी महामंडळाने खाजगी पेट्रोलपंपावर डिझेल भरण्यास सुरूवात केली आहे हे डि 93 ते 95 रू प्रती लिटर या दराने मिळते त्यामुळे एसटी महामंडळाचे लिटरमागे 15 ते 16 रूपये वाचत आहेत. S.T Purchasing Disel from Privete


रत्नागिरी जिल्ह्यात 150 एसटी फेऱ्या सुरू आहेत. त्यासाठी महामंडळाला दिवसाला 10 हजार लिटर डिझेल लागते. खाजगी पेट्रोलपंपावर 15 रूपयाने स्वस्त डिझेल मिळत असल्याने एसटीचे दिवसाला सुमारे दीड लाख वाचतात. S.T Purchasing Disel from Privete


कोरोना महामारी नंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळ आर्थिक संकटात आहे. एसटीचा संप मिटण्याचे नाव घेत नाही. एसटी महामंडऴाने डिझेल खरेदीवर होणारा तोटा भरून काढण्यासाठी डिझेल कंपन्यांऐवजी आता खाजगी पेट्रोलपंपावर डिझेल भरण्याचा निर्णय घेतला आहे. S.T Purchasing Disel from Privete

