विद्यार्थ्यांसाठी दहा दिवसीय कै.सदानंद परकर अभ्यास शिबिराचे उद्घाटन
आबलोली, ता 12 : मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या डॉ.नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली (ता.गुहागर) येथे इ. १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी दहा दिवसीय कै.सदानंद परकर अभ्यास शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञानाचे दृढीकरण, विषयानुसार मार्गदर्शन व पाठांतर, लेखन सराव करून घेतला जाणार आहे. S.S.C. Study Center at Kajurli for students


मुख्याध्यापक दिनेश पवार यांनी प्रास्ताविक केले.आपल्या प्रास्ताविकात त्यांनी शिबिराचे आयोजनाविषयी माहिती दिली. माजी मुख्याध्यापक अमोल पवार यांनी संस्थेच्या वतीने चेअरमन सुनील मयेकर आणि संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अभ्यास शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास साधला जातो त्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाचे या शिबिरात दृढीकरण करून शंका निरसन करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुधाकर गोणबरे, स्थानिक शाळा समिती अध्यक्ष कैलास साळवी, सल्लागार चंद्रकांत खानविलकर, अमोल पवार, दिनेश पवार यांसह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सोनाली गमरे तर आभार प्रदर्शन दामोदर गोणबरे यांनी केले. S.S.C. Study Center at Kajurli for students