रोटरी स्कूलच्या तब्बल 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डिस्टींगशन
गुहागर, ता. 18 : एमएचटी – सीईटी ( MHT CET ) पी.सी.एम. व पी.सी.बी. ग्रुप परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमधील तब्बल 132 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेनटाईल गुण प्राप्त करून आपल्या शाळेचे नाव गौरवित केले आहे. Rotary School’s success in MHT-CET exam
इयत्ता 12 वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी व ॲग्रीकल्चर यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सदर एमएचटी – सीईटी ( MHT CET ) परीक्षा ऑनलाईन रित्या घेतली जाते. यावर्षीही MHT CET या प्रवेश परीक्षेत रोटरी स्कूलच्या एकूण 12 विद्यार्थ्यांनी 99 पेक्षा अधिक पर्सेनटाईल, 31 विद्यार्थ्यांनी 98 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण, 50 विद्यार्थ्यांनी 97 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण, 70 विद्यार्थ्यांनी 95 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण, 125 विद्यार्थ्यांनी 90 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण, 175 विद्यार्थ्यांनी 85 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण, 215 विद्यार्थ्यांनी 80 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण, 250 विद्यार्थ्यांनी 70 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण प्राप्त करून द्वी शतकीय यश प्राप्त केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कोकण विभागात तब्बल 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डिस्टिंशन मिळवून देणारी एकमेव शाळा ठरली आहे. Rotary School’s success in MHT-CET exam


MHT-CET PCM परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु. सेजल पेडणेकर – 99.78 पर्सेनटाईल, कु. अर्चना पाटील -99.65 पर्सेनटाईल, कु. ओम जैन -99.63 पर्सेनटाईल, नील लिमये -99.42 पर्सेनटाईल, कु. सुरज गिम्हवणेकर – 99.09 पर्सेनटाईल, कु. आश्लेषा देवधर -98.92 पर्सेनटाईल, कु. संस्कार साळवी -98.87 पर्सेनटाईल, कु. तेजस कुमार -98.84 पर्सेनटाईल, कु. पार्थ लिंगायत -98.73 पर्सेनटाईल, कु. दिगंत हेगडे -98.68 पर्सेनटाईल, कु. अथर्व चव्हाण -98.63 पर्सेनटाईल, कु. वरद मेणकर -98.61 पर्सेनटाईल, कु. अन्वयी तांबे -98.56 पर्सेनटाईल, कु. गौरव पाटील -98.56 पर्सेनटाईल, कु. मानस राऊल -98.56 पर्सेनटाईल, कु. हर्ष जैन -98.55 पर्सेनटाईल, कु. कृष्णा कुलकर्णी -98.33 पर्सेनटाईल, कु. अर्जुन केळकर -98.20 पर्सेनटाईल, कु. विराज चाळके – 98.19 पर्सेनटाईल यांनी 98 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण मिळवून यश प्राप्त केले. Rotary School’s success in MHT-CET exam


MHT-CET PCB परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु. यश माळी – 99.85 पर्सेनटाईल, कु. तीर्था वैद्य 99.14 पर्सेनटाईल व कु. यश सप्रे 99.14 पर्सेनटाईल, कु. सिद्रा पंजारी – 99.02, कु. शर्वरी घाडगे – 98.86, कु. ध्रुव साळवी -98.53, कु. समृद्धी कुडाळकर – 98.36, कु. तेजल भगत – 98.24, कु. केतकी चिखले – 98.08, कु. सिद्धी महाबळ – 97.99, कु. ओंकार मनवळ – 97.95, कु. दुर्गा पाद्धे – 97.54, कु. निरजा माळी – 97.53, कु. अथर्व मिश्रा- 97.41, कु. आर्यन पवार – 97.32, कु. राज रहाटे -97.07, कु. अनुश्री सागर – 96.97, कु. अरिबा राजिवते – 96.97, कु. सार्थक जाधव – 96.65, कु. सम्यक पांडे – 96.59, कु. मीरा जोशी – 96.56, कु. झिया इनामदार – 96.56 यांनी 97 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण मिळवून यश प्राप्त केले. Rotary School’s success in MHT-CET exam
वरील सर्व विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत रोटरी स्कूलची यशोगाथा कायम राखली आहे. एमएचटी – सीईटी- पी.सी.एम. परीक्षेमध्ये संपूर्ण कोकणात भरघोस यश मिळवणारी रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल ही एकमेव ठरलेली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्स् व बायोलाॅजी या विषयांचे शिक्षक, वर्गशिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. Rotary School’s success in MHT-CET exam


संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी MHT – CET परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Rotary School’s success in MHT-CET exam