गुहागर, ता. 05 : गुरुवार दिनांक 3 जुलै 2025 रोजी रोटरी अकॅडमी महाडच्या जे.ई.ई, नीट आणि सी.ई.टी यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. Rotary Academy students’ praise
सरस्वती मातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात केल्यानंतर रोटरी स्कूलचे चेअरमन मा. श्री. बिपीनदादा पाटणे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवर मा. डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, मा. सौ. नीता शेठ, मा. श्री. प्रदीप शेठ व मा. सौ. अपूर्वा देसाई यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी पुस्तकरुपी भेट देऊन स्वागत केले. Rotary Academy students’ praise


या सत्कार सोहळ्यातील गुणवंतांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जे.ई.ई. मेन्स परीक्षेमध्ये 98.94 पर्सेनटाईल मिळवलेली अर्चना पाटील, 90 पर्सेनटाईलपेक्षा अधिक गुण मिळवलेले इशा गायकवाड, सार्थक सोनकर, श्रावणी भिलारे, मृण्मयी चितळे. नीट प्रवेश परीक्षेच्या जाहीर झालेल्या यशस्वी निकालामधील 98.77 पर्सेनटाईल गुण मिळविलेला यश माळी, 97.52 पर्सेनटाईल गुण मिळवलेली तन्वी जैन तसेच 85 पर्सेनटाईलपेक्षा अधिक गुण मिळवलेले इफ्रा मसिहुद्दीन, समृद्धी कुडाळकर, तेजस भगत, स्वराली लाड. Rotary Academy students’ praise
एम.एच.टी. सी.ई.टी. पी.सी.बी . परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमधील 90 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण मिळवलेले स्मित काकडे, गार्गी जंगम, सिया पोतदार, कस्तुरी पवार. एम.एच.टी. सी.ई.टी. पी.सी.एम. परीक्षेतील यशस्वी 90 पर्सेनटाईलपेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये आदित्य कदम, प्रसाद गोगावले तसेच जे.ई.ई., नीट, एम.एच.टी. सी.ई.टी. प्रवेश परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमुख मान्यवरांच्या यांच्या शुभहस्ते घड्याळ, स्टेथोस्कोप व फ्रेम देऊन गौरविण्यात आले. Rotary Academy students’ praise


यावेळी प्रमुख मान्यवर मा. डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहून ते स्वप्न अभ्यास व जिद्दीच्या बळावर पूर्ण करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर मेहनतीची तपश्चर्या केल्यास त्यांना सहज यश मिळते. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ‘मी हे करू शकतो ‘ असा आत्मविश्वास असायला हवा. विद्यार्थ्यांनी सोशल मिडियावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मोबाइलपासून दूर राहिल्यास विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. रोटरीचे महाडवर उपकार आहेत. त्यांच्या माध्यमातून महाडमधील मध्यम वर्गातल्या मुलांना रोटरी अकॅडमीच्या माध्यमातून सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे असे सांगितले. शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Rotary Academy students’ praise
तसेच प्रमुख मान्यवर मा. सौ. नीता शेठ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रयत्नांमध्ये यश लपलेले असते. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर शंका घेऊ नका. चांगल्या गोष्टींना प्राधान्य द्याअभ्यासावर लक्ष केंद्रित करा. . सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, असे सांगून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Rotary Academy students’ praise


यावेळी पालक सौ. माळी व सौ. गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पालकांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे. मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. त्यामुळेच पालकांनी मुलांच्या योग्य आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांशी संवाद साधणे, मुलांच्या आवडीनिवडी जपताना त्यांच्या अभ्यासाकडेही लक्ष दिले पाहिजे. रोटरीच्या पाठिंब्यामुळेच मुलांनी हे यश प्राप्त केले आहे, असे सांगून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख मान्यवरांचे आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भक्ती करंबेळकर यांनी केले. Rotary Academy students’ praise