आमदार जाधव यांनी बोलावली संबंधित विभागांची बैठक
Guhagar News : तालुक्यातील पालशेत बाजारपेठ पुल येथील समुद्रापर्यंत असलेल्या नदीमध्ये (River Pollution) साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत शिवसेना पक्षाचे नेते आ. भास्करराव जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी दाखल घेत संबंधित बार्जच्या मालकाला संपर्क साधून पालशेत समुद्रकिनारी बार्जमुळे अडलेली पाण्याची वाट मोकळी करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत ५ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे सहाय्यक बंदर निरीक्षक, मेरीटाईम बोर्ड व बार्जचे मालक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.
River Pollution
पालशेत बाजारपेठ पुल येथील समुद्रापर्यंत असलेल्या नदीमध्ये पाणी साचले (River Pollution) आहे. दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. येथील ग्रामस्थ शिवसेनेचे मिनार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व विभाग प्रमुख प्रवीण ओक, नरेंद्र नार्वेकर, रमेश नार्वेकर यांनी पालशेत समुद्रकिनाऱ्यावर (Palshet Beach) पावसामध्ये वाहून आलेल्या महाकाय बार्जमुळे पाण्याचा प्रवाह बदलल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. बंद झालेल्या पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग पूर्ववत करून द्यावा, अशी विनंती देखील करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर याबाबत प्रशासनातर्फे कोणतीच कार्यवाही झाली नाही. (River Pollution)
दरम्यान, या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेना विभाग प्रमुख प्रवीण ओक, माजी उप सभापती पांडुरंग कापले स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांनी आ. भास्करराव जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्याशी संपर्क साधून सदरील समस्या लक्षात आणून दिली. त्यावर आ. जाधव यांनी सहाय्यक बंदर निरीक्षक, मेरीटाईम बोर्ड व बार्जचे मालक यांच्याशी संपर्क करून बार्जमुळे अडलेली पाण्याची वाट मोकळी करून देण्याचा निर्णय करून घेतला आहे. त्यामुळे लवकरच यावर मार्ग निघून साचलेले पाणी (River Pollution) समुद्राला सोडले जाणार आहे. त्यामुळे पालशेतवासीयांची दुर्गंधी पासून मुक्तता होणार आहे.
संबंधित बातमी : बार्जमुळे थांबला नदीचा प्रवाह