कर्मचाऱ्यांचे खासदार सुनील तटकरेंना साकडे
गुहागर, ता. 10 : आरजीपीपीएल प्रकल्प बंद पडल्यास गुहागर, चिपळूण आणि दापोलीतील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळी येईल. त्यामुळे कोणत्याही कामगारांना कमी न करता आरजीपीपीएल प्रकल्प कायमस्वरुपी सुरु रहावा.(RGPPL should be permanently operational) असे निवेदन आरजीपीपीएलमधील कर्मचाऱ्यांनी खासदार सुनील तटकरेंना दिले आहे.
वीज निर्मितीसाठी देशात उत्पादीत होणारा गॅस मिळत नाही. विदेशातून आयात केलेल्या गॅसवरील वीज विकली जात नाही. त्यामुळे रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पावर (RGPPL) संकट कोसळले आहे. हा प्रकल्प बंद झाल्यास स्थानिक कामगारांचा रोजगार (Employment) संपणार आहे. प्रकल्प कायमस्वरुपी सुरु रहाण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी प्रकल्प सुरु रहाण्यासाठी खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांची भेट घेतली. त्यांना प्रकल्प बंद पडल्यास स्थानिक तरुणांच्या रोजीरोटीचा प्रश्र्न कसा निर्माण होणार आहे याची माहिती दिली. आणि सध्या RGPPL प्रकल्पात काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी न करता, प्रकल्प कायमस्वरुपी क्रियान्वीत रहावा. यासाठी साकडे घातले. RGPPL should be permanently operational
याबाबत बोलताना प्रकल्पातील कर्मचारी आणि गुहागर (Guhagar) नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल गोयथळे म्हणाले की, खासदार तटकरे यांना प्रकल्पात आज 95 टक्के स्थानिक कामगार आहेत. आरजीपीपीएलमुळे स्थलांतर थांबले. स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. हा प्रकल्प थांबल्यास सर्वप्रथम स्थानिकांच्या नोकऱ्यांवर टाच येईल. कोरोना महामारीनंतर अन्यत्र नोकऱ्या मिळत नाहीत. प्रकल्प बंद झाल्यास 600 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल. असे सांगितले. हा प्रकल्प कायमस्वरुपी सुरु रहाण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली आहे. RGPPL should be permanently operational
खासदार तटकरे यांनी आमच्याकडून माहिती घेतल्यानंतर आमच्यासमोरच थेट उर्जा मंत्रालयाशी संपर्क केला. या प्रकल्पाबाबतची माहिती मागवली आहे. आपण कर्मचाऱ्यांच्या सोबत आहोत. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर याबाबतचा पाठपुरावा नक्की करेन. असे आश्र्वासन दिले आहे. RGPPL should be permanently operational