बेरोजगारीचे संकट ; कोकण एलएनजीवरही परिणाम?
गुहागर, ता. 02 : मार्च अखेर रेल्वेसोबतच करार संपल्यामुळे 31 मार्चला रात्री 12.00 वा. रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील वीज निर्मिती ठप्प RGPPL Project was Shutdown झाली. या वेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सामंता, जॉन फिलीप मनुष्यबळ विभाग प्रमुख फिलीप यांच्यासह प्रमुख अधिकारी पॉवर ब्लॉकमध्ये उपस्थित होते. हा प्रकल्प पुन्हा सुरु होण्यासाठी आपल्या सर्वांच्या सदिच्छा, आशिर्वाद हवेत. असे आवाहन यावेळी असीमकुमार सामंता यांनी केले. त्यावेळी उपस्थित सर्वजण भावनाविवश झाले. प्रकल्प पुन्हा सुरु व्हावा यासाठी आरजीपीपीएलचे अधिकारी विविध मार्गाने शर्थींचे प्रयत्न करत आहेत. अशी माहिती मनुष्यबळ विभाग प्रमुख जॉन फिलीप यांनी गुहागर न्यूजला दिली आहे.
RGPPL Project was Shutdown
आरजीपीपीएल कंपनी बंद पडल्याने आता बेरोजगारीचे मोठे संकट गुहागर तालुक्यावर कोसळले आहे. करार संपणारे कामगार, कार्यालयीन कर्मचारी यांच्या करारांचे नुतनीकरण करणे कंपनीने बंद केले. त्यामुळे यापूर्वीच सुमारे 75जण बेरोजगार झाले आहेत. 31 मार्चला रात्री सुमारे 185 जणांना कामावर ने येण्याची सूचना देण्यात आली. हळुहळु ही संख्या वाढणार आहे. आरजीपीपीएल बंद पडल्यास 4 हजार 630 माणसे रस्त्यावर येतील. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ या विषयात लक्ष घालावे. असा इशारा यापूर्वी आमदार भास्कर जाधव MLA Bhaskar Jadhav) यांनी राज्याच्या अधिवेशनात दिला होता.
Konkan LNG can be affected?
बेरोजगारीसोबत कंपनी बंद पडल्याचा फटका कोकण एलएनजीलाही बसणार आहे. मुळात दाभोळ वीज प्रकल्प उभा रहातानाच वीज निर्मिती (Power Production), परदेशातून गॅस आयात करणे (Gas Impor), रिगॅसीफिकेशन Regasification) आणि पाईपद्वारे गॅस वहातूक (Distribution gas in India) असे चार प्रकल्प एकाच कंपनीत अंतभूत होते. त्यामुळे या चार स्वतंत्र युनिटची बांधणी, आरेखन, तांत्रिक बाबी एकमेकाला संलग्न आहेत. वीज निर्मिती प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या गरम पाण्याचा वापर द्रवरुप गॅसचे वायुत रुपांतर करण्यासाठी केला जातो. तर रिगॅसीफिकेशन प्रकल्पातील गॅस इंधन म्हणून वीजनिर्मितीसाठी वापरता येतो.
पाच वर्षांपूर्वी कर्जाच्या डोंगरातून आरजीपीपीएलला बाहेर काढताना गॅसचे युनिट स्वतंत्र करुन कोकण एलएनजी (Konkan LNG) या कंपनीची निर्मिती झाली. कागदावर ही कंपनी स्वतंत्र झाली असली तरी रिगॅसीफिकेशनसाठी आवश्यक गरम पाणी आरजीपीपीएलमधुनच मिळत होते. परंतू आता आरजीपीपीएलमधील वीज उत्पादन बंद झाल्याने हे गरम पाणी कोकण एलएनजीला मिळणार नाही. साधारणपणे सप्टेंबर ते मे या कालावधीत सर्वाधिक गॅसवाहु जहाजे कोकण एलएनजीच्या जेटीवर येतात. यामधील द्रवरुप गॅसचे वायु रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला फटका बसणार आहे.
वीज खरेदीदारासाठी प्रयत्न सुरुच : जॉन फिलीप
आरजीपीपीएलमधील वीज खरेदी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे शर्थींचे प्रयत्न सुरु आहेत (Betting efforts to find electricity buyers continue). नुकतीच दिल्लीत उर्जा, नैसर्गिक वायु आणि रेल्वे या मंत्रालयांच्या सचिवांसोबत आरजीपीपीएलच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. आरजीपीपीएलचे एक अधिकारी केंद्रात समन्वय साधण्यासाठी दिल्लीला थांबले आहेत. अशी माहिती मनुष्यबळ विभाग प्रमुख जॉन फिलीप यांनी दिली.
सकाळशी बोलताना फिलीप म्हणाले की, आरजीपीपीएल हा रत्नागिरी जिल्ह्याचा मुकुट आहे. एवढा मोठा प्रकल्प बंद पडणे (RGPPL Project was Shutdown) ही आमच्यासाठी दु:खाची बाब आहे. हा प्रकल्प सुरु व्हावा म्हणून रत्नागिरीकरांच्या शुभेच्छा आम्हाला हव्या आहेत. गेले चार महिने आम्ही शर्थीचे प्रयत्न करत आहोत. (Betting efforts to find electricity buyers continue) नुकतीच दिल्लीत उर्जा, नैसर्गिक वायु आणि रेल्वे या मंत्रालयांच्या सचिवांसोबत आरजीपीपीएलच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. आरजीपीपीएल RGPPL चे एक अधिकारी (Additional General Manger) केंद्रात समन्वय साधण्यासाठी दिल्लीला थांबले आहेत. अशी माहिती मनुष्यबळ विभाग प्रमुख (HR Dept. Head) जॉन फिलीप यांनी दिली.
28 मार्चला दिल्लीमध्ये अतिरिक्त सचिव बी. के. देवांगण यांच्या कार्यालयात उर्जा (Power), नैसर्गिक वायु (Natural Gas) आणि रेल्वे (Indian Railway) मंत्रालयाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत आरजीपीपीएलमधील अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये रेल्वे मंत्रालयाने पुन्हा एकदा वीज खरेदीसाठी तयार असल्याचे सांगितले. 2017 मधील दरापेक्षा अधिकचा दर देण्यासही रेल्वे तयार आहे. मात्र विदेशी गॅसवरील वीजनिर्मितीमध्ये 12 रु. प्रति युनिट इतका दर रेल्वेला परवडणारा नाही. हा दर कमी करावा अशी रेल्वेची मागणी आहे. परंतू विदेशी गॅस महाग असल्यामुळे उत्पादीत विजेचा दर कसा कमी करायचा. हे आरजीपीपीएल समोर आव्हान आहे. या बैठकीतून सकारात्मक काही घडले नसले तरी अजुनही निर्णय झालेला नाही. आरजीपीपीएलचे अतिरिक्त व्यवस्थापक (Additional General Manger) तेथील अधिकाऱ्यांशी आजही संवाद साधत आहेत.
महाराष्ट्रातील सरकार आणि प्रशासन यांच्यासोबत आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असीमकुमार सामंता दररोज संवाद साधत आहेत. मनुष्यबळ विभाग प्रमुख जॉन फिलीप खासदार सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव आदी लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आहेत. याशिवाय अन्य राज्ये, औद्योगिक क्षेत्राबरोबर संपर्कात राहून वीज खरेदीदारसाठी बोलणी सुरु आहेत.