• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

करार न वाढवल्याने 25 कर्मचारी बेरोजगार

by Mayuresh Patnakar
February 25, 2022
in Guhagar
16 0
1
RGPPL not renewed workers Contract

RGPPL not renewed workers Contract

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरजीपीपीएल, अन्य कंत्राटी कर्मचारी देखील गॅसवर

गुहागर, ता. 25 : मार्च 2022 नंतर वीज खरेदीदार न मिळाल्याने रत्नागिरी गॅस आणि वीज (RGPPL)   प्रकल्पाने नवे करार न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कराराची मुदत संपलेले 25 कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. हेच धोरण राहील्यास बेरोजगारीची वेळ अन्य 550 कर्मचाऱ्यांवर येणार आहे. त्यामुळे सर्वच स्थानिक कंत्राटी कामगार सध्या गॅसवर आहेत. RGPPL not renewed workers Contract


विदेशी गॅस वापरुन उत्पादित होणारी वीज भारतातील खरेदीदारांना परवडत नाही. तर देशी गॅस वीज निर्मितीसाठी (RGPPL)   उपलब्ध होत नाही. त्यामुळे गॅसद्वारे वीज निर्मिती करणाऱ्या रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीवर आर्थिक संकट ओढवले आहे. देशी गॅस मिळत नसल्याने सध्या केवळ 250 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पातून सुरु आहे. 1964 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प केवळ 12.72 टक्के वीजनिर्मिती करत आहे. RGPPL not renewed workers Contract

मार्च 2022 नंतर नवा वीज खरेदीदार मिळालेला नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प प्रिझर्व्हेशनमध्ये ठेवण्याची वेळ कंपनी व्यवस्थापनावर आली आहे. या कालावधीत वीज केंद्रामधील देखभाल दुरुस्तीची कामे प्रकल्पातील एन.टी.पी.सी.च्या अभियंत्यांद्वारे केली जातील. अशावेळी व्यवस्थापकीय खर्च कमी करावा म्हणून आरजीपीपीएलने (RGPPL)  कोणत्याही कराराला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला. RGPPL not renewed workers Contract

या निर्णयाचा फटका फेब्रुवारीमध्ये मुदतवाढ असलेल्या स्थानिक कर्मचाऱ्यांना बसला आहे. 25 स्थानिक कर्मचाऱ्यांची मुदत न वाढविल्याने त्यांची सेवा समाप्त झाली आहे. आता पुन्हा कधी कामावर यायचे हे देखील कंपनीने सांगितलेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर सध्या बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. त्याच्याप्रमाणे आणखी 550 कर्मचारी सध्या गॅसवर आहेत. कामाची मुदत संपल्यावर आपल्यालाही बेरोजगार व्हावे लागणार आहे. अशी मानसिकता या कर्मचाऱ्यांनीही करुन ठेवली आहे. RGPPL not renewed workers Contract


या परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. भविष्यात कंपनी बंद पडल्यास एन.टी.पी.सी.चे लोक अन्य प्रकल्पात जातील. मग आमचे काय. 20 वर्षांपेक्षा जास्त काळ इथे नोकरी केल्यानंतर वयाच्या 40-45 व्या वर्षी आम्हाला बाहेर नोकरी कोण देणार. कंपनीत भागीदार असलेले राज्य सरकार निर्णय घेत नसल्याचा फटका आम्हाला बसत आहे. अशी प्रतिक्रिया या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. RGPPL not renewed workers Contract


कोणाचीही नोकरी जावे असे आम्हालाही वाटत नाही. परंतु वीजनिर्मितीच होणार नसेल तर प्रकल्प कसा चालु रहाणार. कंपनी व्यवस्थापन आमदार, खासदार, उच्चस्तरीय अधिकारी यांच्या भेटी घेवून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न जीव तोडून करत आहे. RGPPL not renewed workers Contract
– जॉन फिलीप्स, विभाग प्रमुख मनुष्य संसाधन, आरजीपीपीएल

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRGPPL not renewed workers Contractटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.