नैसर्गिक वायु उपलब्ध न झाल्याने आरजीपीपीएल हतबल
गुहागर, ता. 28 : रेल्वेसोबतचा करार संपल्यानंतर आरजीपीपीएलमधील (RGPPL) वीज उत्पादन बंद झाले आहे. वीजेसाठी खरेदीदार शोधत असताना आरजीपीपीएलला तामिळनाडू राज्याला वीज देण्याची संधी मिळाली होती. मात्र युद्धामुळे रशियाकडून भारताला होणारा नैसर्गिक वायुचा पुरवठा थांबल्याने तामिळनाडूला आरजीपीपीएल वीज पुरवठा करु शकली नाही. RGPPL missed Opportunity to supply electricity
जानेवारी 2022 पासून आरजीपीपीएल (RGPPL)व्यवस्थापन वीजेसाठी खरेदीदार शोधत आहे. 31 मार्च 2022ला रेल्वेबरोबर केलेला वीज करार संपला आणि वीजनिर्मिती प्रकल्प ठप्प झाला. विविध राज्यांशी वीज खरेदीबाबत बोलणी सुरु होती. एप्रिल 2022 मध्ये तामिळनाडू राज्याने आरजीपीपीएलबरोबर महिनाभरासाठी 140 मेगावॅट वीजपुरवठ्याचा प्रस्ताव ठेवला होता. देशातील कोळसा कमी होत असल्याने वीज उत्पादन सुरु केल्यानंतर मे महिन्यात तामिळनाडूसह अन्य राज्यांना वीज पुरवठा करता येईल. प्रकल्प सुरू राहील. असा विचार करुन परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूवर वीजनिर्मिती करण्यास आरजीपीपीएल व्यवस्थापन तयार झाले. त्यासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर दर निश्चित झाले. RGPPL missed Opportunity to supply electricity
भारतामध्ये सर्वाधिक नैसर्गिक वायु रशियास्थित गॅझप्रोम या कंपनीकडून येतो. गॅस इंडिया ॲथॉरिटीने गॅझप्रोमबरोबर दरवर्षी 2.5 मिलियन टन्स नैसर्गिक वायु सर्वात स्वस्त दरात मिळावा म्हणून 20 वर्षांचा करार केला आहे. हा सर्व गॅस अंजनवेलमधील कोकण एलएनजीच्या जेटीवर उतरवला जातो. तेथे प्रक्रिया करुन गेल कंपनी हा गॅस विविध राज्यात वितरीत करते. RGPPL missed Opportunity to supply electricity
परंतु युक्रेन रशिया युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक वायुचा तुटवडा भासु लागला आहे. परिणामी नैसर्गिक वायुचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम गॅझप्रोमकडून मिळणाऱ्या नैसर्गिक वायुवर झाला. नैसर्गिक वायुचा आवश्यक त्याप्रमाणात पुरवठा नसल्याने गेलने वीजनिर्मितीसाठी आवश्यक गॅस देण्यास असमर्थता दर्शविली. परिणामी महत्प्रयासाने मिळालेल्या वीजखरेदीदाराची मागणी आरजीपीपीएल (RGPPL) पूर्ण करु शकली नाही. त्याचबरोबर वीजनिर्मिती सुरु झाल्यावर अन्य खरेदीदार शोधण्याच्या आरजीपीपीएलच्या स्वप्नांवर पाणी फिरले. आता नैसर्गिक वायुचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आरजीपीपीएल प्रकल्प सुरु होण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. RGPPL missed Opportunity to supply electricity