वापरात नसलेल्या जलतरण तलावात तिलापियाचे उत्पादन
गुहागर, ता. 25 : वापरात नसलेल्या जलतरण तलावात मत्स्यशेतीचा प्रयोग (RGPPL doing Aquaculture) रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला आहे. तिलापिया माशांचे उत्पादन कंपनीने घेतले आहे. मत्स्यशेतीच्या यशस्वी प्रयोगातील अनुभवाचा उपयोग करुन परिसरातील ग्रामस्थांना उत्पन्नाचा नवा स्तोत्र उपलब्ध करुन देण्यासाठी कंपनी आगामी काळात प्रयत्न करेल. असा विश्र्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता यांनी व्यक्त केला आहे.


गेले दोन महिने आरजीपीपीएलमधील वीज उत्पादन बंद आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढुन टाकल्याने कंपनीवर स्थानिकांचा, लोकप्रतिनिधींचा दबाव वाढतोय. अशा नकारात्मक परिस्थितीतही पर्यावरण रक्षण (Environmental protection), पर्यावरण संवर्धन (Environmental Conservation), संसाधनाचा योग्य वापर यासाठी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता आग्रही आहेत. या प्रकल्पावर त्यांची नियुक्ती झाल्यानंतर सामंता यांनी आरजीपीपीएल निवासी वसाहतीमध्ये विविध वृक्षांची लागवड केली. किचन गार्डनसाठी आग्रह धरला. स्वच्छता, प्लास्टीक मुक्त परिसरासाठी सर्वांना प्रेरित केले. आरजीपीपीएल प्रकल्पांतर्गत पर्जन्यजल साठवून (रेनवॉटर हार्वेस्टिंग Rain Water Harvesting) त्यांचा अधिकतम वापर कंपनीसाठी केला. याच मोहिमेचा भाग म्हणून डिसेंबर 2021 मध्ये मत्स्यशेतीचा (Fish Farming) प्रयोगही कंपनीमध्ये करण्यात आला. RGPPL doing Aquaculture


RGPPL doing Aquaculture
कंपनीच्या परिसरातील एक जलतरण तलाव कित्येक वर्ष वापराविना पडून होता. स्थापत्य विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे त्यांची देखभाल ठेवली जात असे. सामंता यांनी या विभागाला जलतरण तलावात मत्स्यशेतीचा प्रयोग करण्याची विनंती केली. मत्स्यशेती तज्ज्ञ डॉ. श्रीधर देशमुख यांची या प्रयोगासाठी मदत घेण्यात आली. 1 डिसेंबर 2021 रोजी तिलापिया (Tilapia Fish) जातीच्या माशांचे 2000 मत्स्यबीज (Fish Seed)या तलावात सोडण्यात आले. डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य विभागाचे काही कर्मचारी मत्सखाद्य पुरवणे, तलाव स्वच्छ राहील असे पहाणे, तलावातील पाणी बदलणे आदी कामे करत होते. गेल्या सहा महिन्यात उत्पादन योग्य माशांची वाढ तलावात झाली आहे. कंपनीतील अनेक अधिकारी कर्मचारी मत्स्यशेतीचा यशस्वी प्रयोग पहाण्यासाठी या तलावाला भेट देत आहेत. RGPPL doing Aquaculture


या प्रयोगाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता (RGPPL CEO Asim Kumar Samanta) म्हणाले की, मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना यापूर्वीच तयार केली आहे. मत्स्यशेतीच्या प्रयोगातून आमचे कर्मचारी अनुभवसंपन्न झाले आहेत. मत्स्यशेती करु इच्छिणाऱ्या गावकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा आत्मविश्र्वास त्यांच्याकडे आहे. याचा फायदा कंपनी परिसरातील गावकऱ्यांनी करुन घ्यावा. RGPPL doing Aquaculture