रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनचा घेणार आढावा
Guhagar News, ता. 06 : रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा (Review of Jal Jeevan Mission) घेण्यासाठी 7 एप्रिलला गुहागरमध्ये सभा बोलावण्यात आली आहे. या सभेला केंद्रीय जलशक्ती मंत्रालय (Ministry of Jal Shakti) चे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल (Pralhad Singh Patel) उपस्थित रहाणार आहेत. या दौऱ्यात प्रल्हादसिंग ओबीसी (OBC) समाजाच्या जिल्हा समितीबरोबर चर्चा करणार आहेत. त्यानंतर आढावा सभेनंतर भाजपच्या संघटनात्मक बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. पक्षाच्या बैठकीनंतर गुहागरमध्ये देवदर्शन, ग्रामस्थांबरोबर संवाद साधुन प्रल्हाद सिंह पटेल दापोलीकडे रवाना होतील. Review of Jal Jeevan Mission
ग्रामीण भागातील प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळाले पाहीजे. या उद्देश्याने जल जीवन मिशन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणली. यापूर्वीची हर घर नल या योजनेची ही सुधारीत आवृत्ती आहे. केंद्र सरकार द्वारे या योजनेसाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. मात्र स्थानिक पातळीवर केंद्र सरकारच्या या योजनेचे श्रेय स्थानिक लोकप्रतिनिधी घेताना दिसत आहेत. या पार्श्र्वभुमीवर रत्नागिरी जिल्ह्यात जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री जलजीवन मिशनचा आढावा घेणार आहेत. Review of Jal Jeevan Mission
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या केंद्रातील सर्व मंत्र्यांना स्वत:चे राज्य सोडून अन्य राज्यातील एका लोकसभा मतदारसंघाला भेट देण्याची योजना बनवली आहे. या योजनेअंतर्गत केंद्रीय फळ प्रक्रिया उद्योग व जलशक्ती मंत्रालयाचे (Ministry of Food Processing, Ministry of Jalshakti) राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे रायगड लोकसभा मतदारसंघ (Raigad Lok Sabha Constituency) देण्यात आला. गेले 5 महिने वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचा दौरा पुढे जात होता. अखेर 7 एप्रिलला प्रल्हाद सिंह यांचा दौरा निश्चित झाला आहे. 6 एप्रिलला नेत्रावतीने ते रात्री चिपळूणला आले. रात्री कापसाळ येथे संतोष मालप यांच्या निवासस्थानी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. Review of Jal Jeevan Mission
शुक्रवार 7 एप्रिलला सकाळी 9 वाजता गुहागर येथे ओबिसी (OBC) समाजाच्या जिल्हा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर हॉटेल शांताई येथे रत्नागिरी जिल्ह्याची जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियानासंदर्भातील बैठक होणार आहे. ही बैठक संपल्यावर श्रीपुजा सभागृह पाटपन्हाळे येथे गुहागर तालुक्यातील भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक बैठकीला ते मार्गदर्शन करतील. Review of Jal Jeevan Mission in Ratnagiri
7 एप्रिलला दुपारी भोजनानंतर प्रल्हाद सिंह पटेल व्याडेश्र्वर व दुर्गादेवी मंदिरात दर्शन घेतील. यावेळी दुर्गादेवी मंदिरात गुहागरमधील स्थानिकांबरोबर ते संवाद साधणार आहेत. दुपारी 3.00 नंतर अंजनवेल कातळवाडी येथे जलजीवन मिशनबाबत ग्रामस्थांजवळ चर्चा असा कार्यक्रम आहे. Review of Jal Jeevan Mission
7 एप्रिलला सायंकाळी 7.30 वा. दाभोळ येथील जलजीवन योजनेचे भुमिपूजन आणि धन्यवाद सभा होईल. 8 एप्रिलला दुपारपर्यंत प्रल्हाद सिंह पटेल यांच्या उपस्थितीत दापोली तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ते महाडमार्गे पुणेकडे रवाना होतील. Review of Jal Jeevan Mission