ज.मो.अभ्यंकर, राज्य अल्पसंख्याक आयोगातर्फे आढावा
रत्नागिरी, ता. 21 : प्रधानमंत्री यांच्या 15 कलमी कार्यक्रमात होणारे काम हे अल्पसंख्याकांना आश्वासक वाटेल अशा पध्दतीने करा अशा सूचना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी संबंधित विभाग व यंत्रणांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत याबाबतचा आढावा आयोगामार्फत घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.सोबत राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचा देखील आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. Review by State Minorities Commission

अल्पसंख्याकांना शिक्षणाचा हक्क आणि हक्काचे शिक्षण यात यंत्रणांची भूमिका मोठी आहे. मधेच शिक्षण सोडून देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा वेळोवळी आढावा घ्या व आवश्यक उपाययोजना करा असे सांगून ते म्हणाले की पूर्वप्राथमिक स्तर विद्यार्थ्यांना पोषण आहार आणि त्यांची आरोग्य तपासणी यावर देखील विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असेही श्री. अभ्यंकर म्हणाले. Review by State Minorities Commission
या बैठकीत 15 कलमी कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अल्पसंख्याकांच्या शाळांना मुलभूत सुविधांचे काम पूर्ण होत नाही तोवर अनुदान जारी ठेवा असेही ते म्हणाले. जिल्ह्यात असणारी खाजगी तसेच जिल्हा परिषद उर्दू शाळांची स्थिती तसेच मातृभाषा व्यतिरिक्त इतर भाषांमधून शिक्षण घेणाऱ्यांबाबतही यावेळी माहिती घेण्यात आली. Review by State Minorities Commission

रत्नागिरी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 16 लाख 15 हजार 69 इतकी आहे. त्यापैकी 18.96 टक्के नागरिक अल्पसंख्याक समाजातील आहेत. यात सर्वाधिक 1 लाख 87 हजार 197 (11.59 टक्के) मुस्लीम तर 1 लाख 13 हजार 467 (7.03 टक्के) बौध्द आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. ही आकडेवारी सन 2011 च्या जनगणनेवर आधारित आहे. Review by State Minorities Commission
बैठकीत आयोगाचे सचिव शशांक बर्वे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, सहायक आयुक्त समाजकल्याण संतोष चिकणे आदींची उपस्थिती होती. तर अनुसूचित जाती व जमाती समितीच्या बैठकीस आयोगाचे सदस्य आर.डी. शिंदे तसेच के.आर. मेढे यांची उपस्थित होत. Review by State Minorities Commission