• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 March 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्ह्यात दि.1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताह

by Manoj Bavdhankar
July 29, 2023
in Ratnagiri
103 1
0
Revenue week in the district
203
SHARES
580
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी, दि. 29 : 1 ऑगस्ट हा राज्यभर महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. Revenue week in the district

 महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळच्या वेळी व वेळापत्रानुसार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. महसूल व वन विभाग 25 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार 1 ते 7 ऑगस्ट हा महसूल सप्ताह साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. Revenue week in the district

या सप्ताहात 1ऑगस्ट रोजी महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करणे, महाराष्ट्र  महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 खालील प्रकरणे तलाठ्यांमार्फत ई-हक्क पोर्टलवर सेतू सुविधा केंद्रामार्फत नोंदवून तहसीलदारांकडे पाठविणे. गाव तेथे स्मशानभूमी/दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविणे.
2 ऑगस्ट रोजी युवा संवादमध्ये 10 वी, 12  वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले, प्रमाणपत्रे याबाबत प्रलंबित अर्ज निकाली काढणे. प्रमाणपत्र, दाखल्यांबाबतची माहिती, आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहितीपत्रक प्रसिध्द करणे.
3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा यात नुकसानीबाबत पात्र नागरिकांना लाभ देण्याबाबतची कार्यवाही करणे.
4 ऑगस्ट रोजी जनसंवाद मध्ये महसूल अदालतीचे आयोजन करुन प्रलं‍बित असलेली प्रकरणे निकाली काढणे. Revenue week in the district
5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी अंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर कार्यवाही करणे.
6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत असलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणे.
7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभात सप्ताहातील विविध उपक्रमांबाबतची फलनिष्पत्ती, विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन सांगता समारंभ आयोजित करणे, असे उपक्रम करण्यात येणार आहेत. Revenue week in the district

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRevenue week in the districtटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share81SendTweet51
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.