तहसीलदार परीक्षित पाटील, महसूल सप्ताह ची सुरुवात
गुहागर, ता. 05 : जनतेला शिधापत्रिकेपासून ते विविध दाखले देण्याचे काम महसूल करते, जनतेजवळ अधिक संपर्क राखत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी आपले महसूल विभाग करते. म्हणूनच महसूल विभाग शासनाचा कणा आहे. असे प्रतिपादन गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले. गुहागर महसूल विभागाच्या वतीने महसूल सप्ताह ची सुरुवात एक ऑगस्ट महसूल दिनाने करण्यात आली. Revenue Week
गुहागर शहरातील ज्ञान रश्मी वाचनालयाच्या सभागृहामध्ये तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याअध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गुहागर तहसील कार्यालयातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले तर उत्कृष्ट खेळाडू यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व दाखले वाटप असा कार्यक्रम पहिल्या दिवशी घेण्यात आला. महसूल अधिकारी राजेश कोळवणकर यांनी महसूल सप्ताहाची प्रस्तावना केली. त्यानंतर लाभार्थ्यांना शिधापत्रिका, प्रमाणपत्र, दाखले वाटप करण्यात आले. Revenue Week

उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना वितरित करण्यात आलेल्या पुरस्कारामध्ये निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती स्नेहल मेहता, महसूल नायक तहसीलदार महेंद्र सावर्डेकर, सहाय्यक महसूल अधिकारी राजेश कोळवणकर, सहाय्यक महसूल अधिकारी जयवंत कदम, सचिन गवळी, महसूल सहाय्यक सुभाष कदम, अक्षय संखे, सुनील वराडकर, मंडळ अधिकारी गुहागर प्रीती रेवाळे, मंडळ अधिकारी पाटपन्हाळे अनिल राठोड, मंडळ अधिकारी आबलोली आनंद काजरोळकर, ग्राम महसूल अधिकारी विनोद जोशी, प्राची घाणेकर, अविनाश कदम, आकाश बरकडे, शिपाई प्रियांका मोरे, महसूल सेवक प्रकाश बोडेकर, अमित जोशी, श्रुतिका आदवडे, संगणक परिचालक प्राची आरेकर, वृषाली महाडिक, सिद्धी साखरकर, अरविंद पड्याळ यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. Revenue Week
कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार करताना इयत्ता दहावी मध्ये मैत्रेही शिंदे हिला 92.80% गुण, शौर्या पवार 85 टक्के गुण, पूर्वा शिंदे 84.20% गुण मिळवले. कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2024 – 25 मध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून यश मिळवलेले बॅडमिंटन आणि खोखो गोल्ड मेडल मंडळ अधिकारी प्रीती रेवाळे, टेबल टेनिस सिल्वर मेडल ग्राम महसूल अधिकारी प्राची घाणेकर, कबड्डी पहिला क्रमांक रनिंग तिसरा क्रमांक महसूल सेवक अभिषेक मयेकर, खोखो आणि सांस्कृतिक मध्ये महसूल सेवक पंकज आग्रे आणि खोखो गोल्ड आणि रनिंग रिले सिल्वर महसूल सेवक श्रुतिका आदवडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. Revenue Week
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार परीक्षित पाटील, महसूल नायब तहसीलदार विद्याधर वैशंपायन, निवडणूक नायब तहसीलदार स्नेहल मेहता, पुरवठा निरीक्षक भावना दोताळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक महसूल अधिकारी राजेश कोळवणकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. Revenue Week