मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत आयोजित
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 16 : गेली २८ वर्ष सामजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,आरोग्य, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण आणि एडस आदी क्षेत्रात कार्यरत असलेली रत्नागिरी जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत(ता. चिपळूण)या संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विधवा प्रथा बंद ‘माझे मत’ लेखन स्पर्धा २०२३ या शीर्षकांतर्गत स्पर्धेचा निकाल संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांनी नुकताच जाहीर केला आहे. Result of ‘Widow Prattha Bandh’ competition

महाराष्ट्रातील कोल्हापुर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन राज्यसरकारने सर्व ग्रामपंचायतींना विधवा प्रथा बंद करण्याचा आदेश दिला होता. या विधवा प्रथा बंदचा निर्णय स्वागतार्ह मानून गेली २८ वर्ष विविध क्षेत्रात कार्यरत असलेली रत्नागिरी जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या कौटुंबिक सेवाभवी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय विधवा प्रथा बंद ‘माझे मत’ लेखन स्पर्धा-२०२३ आयोजित केली होती. सदर स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रज्ञावंत समाजघटकांनी सहभाग नोंदवून हि स्पर्धा यशस्वी केली. या लेखन स्पर्धेत सर्वोत्तम दहा विजेत्या स्पर्धकांची युगनायिका सावित्रीबाई फुले ‘क्रांतीज्योती लेखणी’ सन्मान २०२३ या पुरस्काराकरिता निवड झाली आहे. Result of ‘Widow Prattha Bandh’ competition
विजेत्या स्पर्धकांची नावे
निवृत्त विंग कमांडर डॉ.राजेश शांताराम जोशी, कृष्णानगर (सातारा), संतोष हरिश्चंद्र कुळे, काविळतळी(चिपळूण), श्रीमती मीरा मनोहर टेके, किरतपुर(छत्रपती संभाजी नगर), ज्योती अमित वराळे, साडवली(संगमेश्वर), सौ.सिद्धी भास्कर चिंचवलकर, देवरुख(संगमेश्वर), श्रावणी सुहास सणस, टाळसुरे(दापोली), जयवंत नारायण चव्हाण, प्रभुआळी (दापोली), विकास गोपाळ खराते, किल्लारी(लातूर), दत्ताराम कृष्णा सावरटकर, कोळकेवाडी (चिपळूण), अंकिता चंद्रकांत पंडित, चिखली(संगमेश्वर) यांनी यश संपादन केले. Result of ‘Widow Prattha Bandh’ competition

या लेखन स्पर्धेचे परिक्षण कोकणचे पहिले दैनिक रत्नभूमीच्या संपादिका आणि दैनिक भैरव टाइम्स(रत्नागिरी) या वृत्तपत्राच्या मालक, मुद्रक व प्रकाशक असलेल्या श्रीमती धनश्री पालांडे व चिपळूणच्या ॲड. विभावरी रजपूत यांनी केले. या दहा विजेत्या स्पर्धकांना डिसेंबर २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात संस्थेच्या खास समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान पुरस्कार व सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना आकर्षक स्वरूपातील सन्मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल. प्रत्येक स्पर्धकाला वैयक्तिकरित्या कळविण्यात येईल. असे संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजयराव शांताराम कदम यांनी सांगितले आहे. Result of ‘Widow Prattha Bandh’ competition
