जिजाऊ-सावित्रीचा वारसा पुढे चालवूया – तहसीलदार प्रतिभा वराळे
गुहागर, दि. 09 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा आबलोली नं.१ येथे महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून आबलोली गावातील व परिसरातील महिलांचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावातील महिलांना भारतिय स्त्रियांचे स्वातंत्र्य ही पुस्तिका, राष्ट्रमातांच्या प्रतिमा आणि पुष्पगुच्छ भेट देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. Respect Female Power in Abaloli


आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामीण भागात आर्थिक परिस्थीती बिकट असूनही महीला आजही स्वकर्तृत्वाने सक्षमपणे कार्यरत आहेत. राजमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाईफूले अशा अनेक राष्ट्र मातांचा आदर्श वारसा आपल्याला लाभला आहे . या आदर्श मातांचा वारसा आपण पुढे चालवूया असे आवाहन गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी करून जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. Respect Female Power in Abaloli
आपल्या संस्काराना आपण जपलं पाहिजे. संविधानाने आपल्याला हक्क,अधिकार दिलेले आहेत त्या संविधानाच्या चौकटित राहून अन्याय, अत्याचाराला वाचा फोडली पाहिजे. मातांनी आदर्शवत संस्कार करून मुला-मुलींना घडवीले पाहिजे असे आवाहन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले. Respect Female Power in Abaloli


यावेळी महिला आरोग्यतज्ञ डॉ.विनिता नातू यांनी महिला, युवती यांना आरोग्य विषयक मौलिक मार्गदर्शन केले. तर प्रा. नमिता वैद्य , गुहागरच्या सभापती पूर्वी निमूणकर, कराटे प्रशिक्षिका सोनाली वरंडे, प्रा. जान्हवी आर्यमाने, तन्मय देवरूखकर यांनी उपस्थित महिलांना विविध विषयांचे मौलिक मार्गदर्शन केले. मनोरंजनपर संगीत खुर्ची स्पर्धेत पायल गोणबरे, दक्षता डिंगणकर, तृप्ती पागडे यांनी सुयश संपादन केले. त्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. Respect Female Power in Abaloli
यावेळी व्यासपिठावर तहसिलदार प्रतिभा वराळे, डॉ. विनिता नातू, सभापती पूर्वीनिमूणकर, माजी सभापती वृषाली वैद्य, उपसभापती सिताराम ठोंबरे, प्रा.जान्हवी आर्यमाने, प्रा. नमिता वैद्य, कराटे प्रशिक्षिका सोनाली वरंडे, सरपंच श्रावणी पागडे, ग्रामसेवक बी.बी. सुर्यवंशी, माजी सरपंच अल्पिता पवार, तुकाराम पागडे, उपसरपंच आशिष भोसले, तन्मय देवरूखकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमेय आर्यमाने, सदस्या मिनल कदम, भारती कदम, साक्षी रेपाळ, पूजा कारेकर, मुग्धा पागडे, मुख्याध्यापिका प्रिया गुहागरकर, शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष उमेश पवार, उपाध्यक्षा नयना वैद्य, संतोष मुंडेकर आदी मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभव ढवळ यांनी केले. Respect Female Power in Abaloli

