गुहागर, ता. 07 : तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या एकुण 6 महसूल मंडळाच्या ठिकाणी बुधवार, ता. 8 जून रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वसामान्य जनतेने त्यांचे जमिनीबाबत काही अडचणी असल्यास त्यांचे निराकरण करणेकरीता फेरफार अदालतमध्ये अर्ज करावेत. असे आवाहन गुहागरच्या तहसिलदार सो. प्रतिभा वराळे यांनी केले आहे. Resolving land issues


या फेरफार अदालतीमध्ये प्रामुख्याने वारस तपासाचे काम, बोजा नोंदणी घालणे व कमी करणे, तगाई बोजे कमी करणे, कर्ज प्रकरणी बँकेने अथवा वसूली अधिकारी यांनी कर्ज माफ केले असल्यास त्याबद्दलचे शेरे कमी करणे, सातबारा मधील किरकोळ स्वरूपातील भोगवटादाराचे नावांतील तफावत दुर करणे/दुरूस्त करणे, हक्कसोड पत्र, बक्षिसपत्र, या सारखी नोंदणीकृत दस्त ऐवजांची नोंद करण्याची कामे केली जाणार आहेत. याच अदालतीमध्ये पिकपिणी नोंदही घालण्यात येणार आहेत. अर्ज प्राप्त झाल्यावर 1 महिण्याच्या आत या नोंदी होतील. Resolving land issues
बुधवार 8 जूनला होणारी फेरफार अदालत तालुक्यात 6 ठिकाणी होणार आहे.
- गुहागर- श्री. एस बी नाडे, मंडळ अधिकारी, कार्यालय गुहागर (8605455931)
- पाटपन्हाळे- श्री. ए.एस. काजरोळकर मंडळ अधिकारी, कार्यालय पाटपन्हाळे (9405728123)
- हेदवी – श्री. व्ही. व्ही. मोरे मंडळ अधिकारी, कार्यालय हेदवी (9421934342)
- पालशेत – श्री. व्ही. व्ही. मोरे मंडळ अधिकारी, कार्यालय पालशेत (9421934342)
- आबलोली – श्री. एस. पी. गवळी मंडळ अधिकारी, कार्यालय आबलोली (9922176134)
- तळवली- श्री. एस. एफ. साळुंखे मंडळ अधिकारी, कार्यालय तळवली (8275431029)
तरी या योजनेचा अधिकाधिक जनतेने लाभ घ्यावा व शासनाच्या या उपक्रमास सहकार्य करावे, ही विनंती. सद्यपरिस्थिती कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेचे दिसत असलेने कोरोनाचे सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून संबंधित मंडळ अधिकारी यांचेशी दुरध्वनीवर संपर्क साधून वेळ निश्चित करून संबंधित मंडळ अधिकारी कार्यालयात आवश्यक असल्यास हजर रहावे. असे गुहागर तहसिलदार प्रतिभा वराळे यांनी सांगितले आहे. Resolving land issues