गुहागर, ता. 04 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे नुकतेच साखरीआगर येथे सात दिवसीय विशेष निवासी शिबीर संपन्न झाले. Residential camp of Velneshwar College completed

या शिबीराअंतर्गत साखरीआगर येथील समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता, पाणी अडवा, पाणी जिरवा या उपक्रमांतर्गत नदीमध्ये बंधारा बांधणे, ग्रामपंचायत क्षेत्रातील पडीक जमिनीवर वृक्षारोपण, जिल्हा परिषद शाळा, साखरीआगर येथील विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम, समाज जागृतपर प्रबोधनात्मक पथनाट्ये यासारखे विविध समाजभिमुख व मनोरंजनात्मक कार्यक्रम यावेळी पार पडले. Residential camp of Velneshwar College completed

सदर विशेष निवासी शिबिरासाठी सहकार्य करणारे साखरीआगरचे सरपंच सौ. दुर्वा पाटील, जिल्हा परिषद साखरीआगरचे मुख्याध्यापक ईश्वर वासावे व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणुन महाविद्यालयातील प्रा. अरुण सरगर, प्रा. श्रुती मुंढे, प्रा. केशव चौगुले, प्रा. वैभवी मेथा, प्रा. निखील पांढरपट्टे यांनी काम पाहिले. Residential camp of Velneshwar College completed