• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाकिस्तानातून ८० भारतीय मच्छिमारांची सुटका

by Guhagar News
November 13, 2023
in Bharat
61 1
3
Rescue of Indian fishermen from Pakistan
120
SHARES
342
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिल्ली, ता. 13 : पाकिस्तान सरकारने दिवाळीपूर्वी ८० भारतीय मच्छिमारांची सुटका केली. अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मच्छिमारांचे स्वागत केले. सुटका झालेल्या मच्छिमारांनी सांगितले की, मासेमारी करताना चुकून ते पाकिस्तानच्या हद्दीत शिरले होते. हे सर्व जण ३ वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात होते. पाकिस्तान सरकारच्या अवैध परदेशी स्थलांतरितांना आणि नागरिकांना देशातून बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे.  Rescue of Indian fishermen from Pakistan

भारतीय मच्छिमारांना अल्लामा इक्बाल एक्स्प्रेस ट्रेनने कडक सुरक्षा व्यवस्थेत लाहोरला आणले गेले. तेथून त्यांना वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात सोपवले. पाकिस्तानातील सेवाभावी संस्था ईधी वेल्फेअर ट्रस्टचे फैसल ईधी म्हणाले की, बहुतेक भारतीय मच्छिमार गरीब पार्श्वभूमीचे आहेत आणि त्यांना मायदेशी परतताना खूप आनंद झाला आहे. पाकिस्तानातील ईधी वेलफेअर ट्रस्टने स्वतः भारतीय मच्छिमारांना लाहोरपर्यंत आणण्याची व्यवस्था केली. हे सर्व जण लवकरच त्यांच्या कुटुंबीयांना भेटतील, याचा आम्हाला आनंद होत आहे. आम्ही त्यांना घर घेण्यासाठी काही रोख रक्कम आणि इतर भेटवस्तू दिल्या असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. Rescue of Indian fishermen from Pakistan

‘इंडिया पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसी’ या स्वयंसेवी संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य जीवन जंगी म्हणाले, ‘या ८० मच्छिमारांना पाकिस्तानने त्यांच्या हद्दीतील पाण्यात मासेमारी केल्याचा आरोपाखाली अटक केली होती. ते २०२० मध्ये गुजरात किनार्‍यावरून निघाले. आमच्या नोंदीनुसार, १७३ भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. मे आणि जूनमध्ये पाकिस्तान सरकारने अशाच आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सुमारे ४०० भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती. Rescue of Indian fishermen from Pakistan

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRescue of Indian fishermen from Pakistanटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.