• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 September 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालपेणेच्या रुद्र पालकरने साकारला प्रतापगड किल्ला

by Guhagar News
November 22, 2023
in Guhagar
127 1
0
Replica of Pratapgad fort built by Rudra
249
SHARES
711
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण …दिवाळी सण हा सर्वात मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला गेला. या दिवाळी सणात बाळ गोपाळाकडून किल्ले बनवले जातात. दिवाळीत अनेक बाल गोपाळानी आपल्या घरासमोर दगड मातीच्या सहाय्याने किल्ले तयार केले आहेत. या किल्ल्यांना आकर्षक रंग, किल्ल्यांची तडबंदी, किल्ल्यावर पहारा देत असलेले सरदार, मावळे, छत्रपती शिवाजी महाराजांची आसन व्यवस्था, किल्ल्यावर भगवे झेंडे अशा विविध कलाकुसरानी किल्ला सजवला जातो. Replica of Pratapgad fort built by Rudra

गुहागर तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथील कु. रूद्र तेजपाल पालकर यांनी असाच आपल्या घरासमोर सुंदर असा किल्ला बनवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याच्या हेतूने आपल्या कुटुंबाच्या साहाय्याने किल्ला बनवून शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. रुद्रने आपल्या शेतातून आणलेली दगड माती व कुटूबियांच्या सहकार्य घेऊन स्वतःच्या कल्पकतेने प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे. प्रतापगडाची केलेली प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या किल्ल्यामध्ये मावळे, मंदिरे, घोडे, बुरुज, झेंडे, घरे, तोफा यांचे व्यवस्थितपणे मांडली त्याने केली आहे.  Replica of Pratapgad fort built by Rudra

कु. रुद्र हा गेली पाच वर्ष विविध किल्ल्यांची प्रतिकृती तयार करत आहे. यावर्षी त्याने प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे. रुद्र याने युट्युब वरून या किल्ल्याविषयी माहिती घेतली. मागच्या वर्षी त्यांनी मल्हारगड हा किल्ला बनवला होता. त्याला किल्ले बनवण्याचे खूप आवड आहे. प्रतापगड हा किल्ला त्याने एकट्याने तयार केला असून किल्ला बनवणे किंवा गणपतीचे डेकोरेशन तयार करणे याची त्याला खूप आवड असल्याचे त्याचे वडील तेजपाल पालकर यांनी सांगितले. Replica of Pratapgad fort built by Rudra

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPratapgad FortReplica of Pratapgad fort built by Rudraटॉप न्युजताज्या बातम्याप्रतापगड किल्लामराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet62
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.