• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

समर्थ भंडारी पतसंस्थेच्या उमरोली शाखेचा स्थलांतर सोहळा

by Ganesh Dhanawade
January 23, 2023
in Guhagar
116 1
0
Relocation of Bhandari Credit Institution Umroli Branch
228
SHARES
652
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्रामीण भागातील सभासद व गरजूंना आर्थिक सक्षम करण्याचा मानस – प्रभाकर आरेकर

गुहागर, ता. 23 : श्री समर्थ भंडारी नागरी सह पतसंस्थेच्या शाखेचा स्थलांतर सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांच्या हस्ते फीत कापून व उद्योजक श्री. सुरेशशेठ गांधी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. Relocation of Bhandari Credit Institution Umroli Branch

यावेळी उमरोली गावचे सरपंच रुपाली मोहित, बोरगावचे सरपंच सुनील हळदणकर, बामणोली सरपंच सुरेश गमरे, गोंधळेचे सरपंच भूषण खेडेकर आदी उपस्थित होते. संस्थेची उमरोली शाखा ही पहिली शाखा असून तिचा शुभारंभ 2005 मध्ये करण्यात आला होता. उमरोली (चिवली फाटा) यासारख्या ग्रामीण भागात पहिली शाखा सुरू करून सर्वसामान्य ग्रामीण भागातील सभासदांना व गरजूंना सेवा देऊन आर्थिक सक्षम करण्याचा मानस संस्थेने ठेवून कामकाज केल्यामुळे उमरोही शाखेचे प्रशस्त जागेत स्थलांतर झाले. त्याचप्रमाणे उमरोली व परिसरातील सर्वच भागातील सभासद, ग्राहक व हितचिंतक यांनी वेळोवेळी संस्थेला सहकार्य करून संस्थेच्या उमरोली शाखेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिल्याचे श्री. आरेकर यांनी सांगितले. Relocation of Bhandari Credit Institution Umroli Branch

यावेळी शुभेच्छा देताना बोरगावचे सरपंच श्री. सुनील हळदणकर, सरपंच श्री. सुरेश गमरे, रामपूर विकास सोसायटीचे चेअरमन सतीशशेठ चव्हाण, माजी सरपंच श्री. संतोष पडवळकर, शिक्षक श्री. दंडगे यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करून शाखेकडून मिळणारी सेवा अतिशय जलद व आपुलकीची असल्याचे आवर्जून सांगितले. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांचे मार्गदर्शन व संचालक मंडळाचे सहकार्य, कर्मचारी यांचे नियोजनबद्ध कामकाज यामुळे संस्था उत्तोरत्तर प्रगती करत असल्याचे गौवोद्गार त्यांनी काढले. Relocation of Bhandari Credit Institution Umroli Branch

Relocation of Bhandari Credit Institution Umroli Branch

उमरोली शाखेच्या स्थलांतर सोहळ्यासाठी चिवेली विकास सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद आरेकर, सुरेश साळवी, उद्योजक भालचंद्र जोगळे, संस्थेचे संचालक दिलीप मयेकर, सुहास भोसले, अरुण पाटील, विजय जाधव, पराग आरेकर, उदय वेल्हाळ, संचालिका सौ. स्मिता आरेकर, श्रीमती प्रज्ञा नरवणकर, तसेच उमरोली परिसरातील अनेक प्रतिष्ठित व्यापारी, सभासद, ग्राहक, हितचिंतक, शाखाधिकारी श्री. सिद्धेश सुर्वे व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव संदीप रहाटे यांनी केले. Relocation of Bhandari Credit Institution Umroli Branch

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRelocation of Bhandari Credit Institution Umroli Branchटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share91SendTweet57
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.