• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कायाकल्प पुरस्कारात रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाची छाप

by Mayuresh Patnakar
June 14, 2025
in Ratnagiri
91 1
0
Rejuvenation Award announced
179
SHARES
511
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्ह्यात 137 शासकीय आरोग्य संस्थाना कायाकल्प पुरस्कार जाहीर

गुहागर, ता. 14 : “कायाकल्प” ही एक लोकाभिमुख व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सुनिश्चित करणारी योजना आहे. ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांना सक्षम, स्वच्छ, विश्वासार्ह व रुग्णाभिमुख बनवण्याचे हे प्रभावी पाऊल आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या 2024-25  या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. Rejuvenation Award announced

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करून रत्नागिरी  जिल्ह्यातील  1 ग्रामीण रुग्णालय, 19  प्राथमिक आरोग्य केंद्र , 116 आरोग्य उपकेंद्र आणि 1 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अशा एकूण 137 आरोग्य संस्थांनी  हा पुरस्कार पटकावला आहे. यामध्ये चिपळूण तालुक्यातील  प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर ने जिल्हास्तरीय प्राथमिक आरोग्य केंद्रस्तर प्रथम क्रमांक पुरस्कार पटकावला असून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर प्रथम क्रमांक पुरस्कार रक्कम 2 रु.लाख जाहीर झाली आहे. उर्वरित  १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी पुरस्कार रक्कम रु. 50 हजार जाहीर  झाली  आहे. Rejuvenation Award announced

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर पुरस्कारामध्ये  चिपळूण तालुक्यातील रामपूर, कापरे, अडरे, खरवते, राजापूर तालुक्यातील धारतळे, सोलगाव, गुहागर तालुक्यातील कोळवली दापोली तालुक्यातील पिसई, आसूद, उंबर्ले, संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, बुरंबी, वांद्री, लांजा तालुक्यातील रिंगणे, साटवली, शिपोशी, रत्नागिरी तालुक्यातील वाटद, कोतवडे यांचा समावेश आहे. दापोली तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र शिरखळ ला उपकेंद्रस्तर प्रथम क्रमांक पुरस्कार रक्कम रु.1 लाख, तसेच उपकेंद्र माटवन  व उपकेंद्र खेरडी यांना समान गुणांमुळे प्रथम रनर अप  असलेली पुरस्कार रक्कम रु.50 हजार विभागून प्रत्येकी  पुरस्कार रक्कम रु. 25 हजार जाहीर झाली आहे. उपकेंद्र पालगड द्वितीय रनर अप पुरस्कार रक्कम रु.३५ हजार व उर्वरित  ११२ आरोग्य उपकेंद्रांना प्रोत्साहनपर पुरस्कार रक्कम रु. 25 हजार जाहीर झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय देवरुख ला ग्रामीण रुग्णालयस्तर प्रोत्साहनपर पुरस्कार रक्कम 1 लाख जाहीर झाली आहे. Rejuvenation Award announced

सदर कायाकल्प पुरस्कारासाठी सर्व आरोग्य संस्थाना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले होते. जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र गावडे  यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी  व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. पुढे लवकरच मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. Rejuvenation Award announced

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRejuvenation Award announcedटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.