• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 December 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

क्षेत्रीय स्तरावरील 64 वी डाक अदालत

by Guhagar News
November 28, 2025
in Guhagar
75 1
2
Regional level postal court
148
SHARES
423
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी द्वारा 9 डिसेंबर रोजी

रत्नागिरी, ता. 28 : पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी द्वारा 9 डिसेंबर रोजी क्षेत्रीय स्तरावरील 64 वी डाक अदालत सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी  यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे.  संबंधितांनी डाक सेवेबाबतची तक्रार सहायक डाक निदेशक 1, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी ४०३००१ यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह 1 डिसेंबर 2025 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी, त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे डाकघर अधीक्षक, रत्नागिरी यांनी कळविले आहे. Regional level postal court

पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी किवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तू / मनीऑर्डर / बचत बँक खाते / प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा या सर्व तपशीलासह केलेला असावा. Regional level postal court

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRegional level postal courtटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share59SendTweet37
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.