गुहागर, ता. 30 : रिगल कॉलेज, शृंगारतळी येथील हॉटेल व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांनी दापोली तालुक्यातील द फर्न समाली रिसोर्टला भेट दिली. त्याठिकाणी हॉटेल व्यवस्थापन कसे चालते. ग्राहकांना कशी सेवा दिली जाते. याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. Regal College industrial visit


कौशल्य विकास आधारीत अभ्यासक्रमांमध्ये औद्योगिक भेटी हा एक विषय असतो. या अंतर्गत विद्यार्थी त्या क्षेत्रातील प्रतिथयश उद्योगाला भेट देत असतात. शृंगारतळी येथील रिगल कॉलेजमध्ये हॉटेल व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रम शिकवला जातो. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी 28 एप्रिलला दापोली वणौशी मार्गावरील द फर्न समाली रिसोर्टला भेट दिली. यावेळी प्रा. शैलेश घाणेकर , प्रा. वृणाल बेर्डे यांनी मार्गदर्शन केले. द फर्न समालीमध्ये हॉस्पिटॅलिटी व्यवस्थापन, तेथील एक्झिक्युटीव्ह सुट, कॉटेज, रिसेप्शन, स्पा, लॉन्ड्री, जलतरण तलाव, बॅन्क्यूट हॉल, रेस्टॉरंट, व सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (STP) या सर्व गोष्टी पाहिल्या. तेथील कार्य कसे चालते याची माहिती घेतली. तेथील कर्मचारी, अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ग्राहकांना सेवा देताना येणाऱ्या अडचणी काय असतात. त्यावर कसा मार्ग काढायचा. ग्राहकांशी संवाद कसा असावा. हे जाणून घेतले. Regal College industrial visit


द फर्न समाली रिसोर्टचे ऑपरेशनल मॅनेजर पुनीत कुमार व अॅडमिन एक्झिक्युटिव्ह कु. सोनल धामाणे यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण रिसोर्टची माहिती दिली. Regal College industrial visit