व्यावसायिक अभ्यासक्रमातून रोजगाराची संधी
गुहागर, ता.15 : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज (Regal college) शृंगारतळी या महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. Regal college admission
यामध्ये १००% नोकरीची हमी देणारा हॉटेल मॅनेजमेंट डिग्री व डिप्लोमा तसेच मॅनेजमेंटच्या शिक्षणाची संधी बी.बी.ए.(बॅचलर ऑफ बिजिनेस अॅडमिनिस्ट्रेशन) या अभ्यासक्रमामुळे मिळणार आहे. तसेच संस्कृत या देव भाषेचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून संस्थेने “बी.ए. संस्कृत विशारद” हा अभ्यासक्रम चालू केला आहे. डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इव्हेंट प्लॅनर, इव्हेंट मॅनेजर म्हणून नोकरी मिळू शकते. बॅचलर ऑफ कॉम्पुटर अॅप्लीकेशन (बी.सी.ए.) & COPA या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्याना IT सेक्टरमध्ये जॉबची संधी. फॅशन इंडस्ट्री मध्ये करिअर ची संधी देणारा आणि आयुष्यामध्ये नवे रंग भरणारा कोर्स फॅशन डिजायनिंग डिग्री डिप्लोमा. रुग्णांची सेवा घडवणारा व सुसज्ज हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी देणारा नर्सिंग हा कोर्स. तसेच,MSEB मध्ये नोकरीची संधी देणारा इलेक्ट्रिशियन कोर्स डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन हा अभ्यासक्रम आता या कॉलेजमध्ये उपलब्ध झाला आहे. Regal college admission
प्रशासकीय सेवा, कायदेशीर सल्लागार, प्राध्यापक यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देणारा एम.ए.(पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन) हा कोर्स. हे सर्व अभ्यासक्रम रिगल कॉलेज शृंगारतळी शाखा तौहीद मॉल, गुहागर विजापूर महामार्ग, शृंगारतळी, ता:गुहागर येथे शिकविले जाणार आहेत. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. वरील सर्व अभ्यासक्रमांसाठी १२ वी उत्तीर्ण कोणत्याही शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. तरी वरील सर्व १००% नोकरीची व व्यवसायाची हमी देणाऱ्या सर्व अभ्यासक्रमासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन रिगल कॉलेजच्या (Regal college) प्राचार्या. सौ.रेश्मा मोरे यांनी केले आहे. Regal college admission
रिगल कॉलेज शृंगारतळी मधील वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.