• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रामीण डाक सेवकांची (जीडीएस ) भरती

by Guhagar News
May 10, 2022
in Bharat
16 0
0
Recruitment of Rural Postal Servants (GDS)
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ऑनलाइन अर्ज करण्याचे टपाल विभागाचे आवाहन

गोवा, ता. 10 : टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस ) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवाराला 02.05.2022 ते 05.06.2022  या कालावधीत http://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी लागेल. Recruitment of Rural Postal Servants (GDS)

उमेदवारासाठी असलेल्या अन्य अटी पुढीलप्रमाणे आहेत:  i] माध्यमिक शाळा म्हणजे इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ii] जीडीएस  श्रेणींसाठी इच्छुक  उमेदवारांना केंद्र सरकार/राज्य सरकार/विद्यापीठे/मंडळ /खाजगी  संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही संगणक प्रशिक्षण संस्थेकडून किमान 60 दिवसांच्या मूलभूत संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्या प्रकरणांमध्ये उमेदवाराने दहावी किंवा बारावी किंवा इतर कोणत्याही उच्च शैक्षणिक स्तरावर संगणक हा विषय म्हणून अभ्यासला  असेल, अशा प्रकरणांमध्ये मूलभूत संगणक ज्ञान प्रमाणपत्राची ही आवश्यकता शिथिल असेल अशा प्रकरणांमध्ये वेगळे प्रमाणपत्र जोडण्याची गरज नाही. उमेदवार किमान दहावीपर्यंत स्थानिक भाषेतून शिकलेला असावा. गोवा राज्याची स्थानिक भाषा म्हणून कोकणी/मराठी ग्राह्य धरली  जाते. Recruitment of Rural Postal Servants (GDS)

Recruitment of Rural Postal Servants (GDS)

ऑनलाइन अधिसूचना जारी केल्याची तारीख म्हणजेच 02.05.2022 नुसार, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी 18  ते 43 वर्षे, अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी 18 ते 45 वर्षे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी [अनुसूचित जाती/जमाती/ इतर मागासवर्ग प्रवर्गाअंतर्गत समाविष्ट नसलेले उमेदवार आणि ज्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न  रु. 8.00 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा या अनुषंगाने, त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी विहित स्वरूपात उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे]  वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. Recruitment of Rural Postal Servants (GDS)

निवडलेल्या उमेदवाराने निवड झाल्यानंतर एक महिन्याच्या आत आणि रुजू होण्यापूर्वी टपाल कार्यालयाच्या  टपाल ग्राम /वितरण अधिकार क्षेत्रात वास्तव्याला आले पाहिजे. या पदासाठी  अर्ज करण्याच्या उद्देशाने किंवा त्या पदावर निवडीच्या  उद्देशाने, ही अट उमेदवारासाठी  पूर्व-आवश्यक नाही आणि निवड झालेल्या उमेदवाराने निर्धारित वेळेत विहित अटींचे पालन करणे आवश्यक आहे. i] शाखा पोस्ट मास्तर (बीपीएम) आणि इतर ग्राम डाक सेवक (जीडीएस) पदांवरील नियुक्तीसाठी निवडलेल्या उमेदवारांना 1,00,000/- रुपयांच्या  निष्ठा बंधपत्राच्या (फिडेलिटी बॉण्ड) स्वरूपात हमी सादर करणे आवश्यक आहे. अधिक तपशिलांसाठी आणि ऑनलाइन अर्जाच्या नमुन्यासाठी उमेदवाराला  http://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करावी लागेल. Recruitment of Rural Postal Servants (GDS)

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagaronline applicationPostal DepartmentRecruitmentRecruitment of Rural Postal Servants (GDS)Rural Postal Servantsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.