नवी दिल्ली, ता. 05 : सणासुदीमुळे सरलेल्या सप्टेंबर महिन्यात प्रवासी मोटारींना मोठ्या प्रमाणात मागणी येऊन, विक्रीने उच्चांकी पातळी गाठली. मागील महिन्यात ३ लाख ६० हजार मोटारींची विक्री झाली. लोकप्रिय बनलेल्या स्पोर्टस यूटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) श्रेणीतील कंपन्यांकडून दाखल नवनवीन वाहनांची सर्वाधिक विक्री झाली. Record sales of cars
जानेवारी ते सप्टेंबर २०२३ या नऊ महिन्यांच्या काळात ३० लाखांहून अधिक मोटारींची विक्री झाली आहे. अनेक वाहन कंपन्यांनी नवीन एसयूव्ही बाजारात दाखल केल्या आहेत. होंडा इलीव्हेट, सिट्रॉन सी३ एअरक्रॉस यासह अनेक नवीन मॉडेल्स बाजारात दाखल झाली आहेत. त्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी असल्याने यंदा प्रवासी वाहनांच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे. Record sales of cars

देशभरात सप्टेंबरमध्ये ३,६०,७०० प्रवासी मोटारींची विक्री झाली. मागील वर्षी याच महिन्यात ही विक्री ३,५५,३५३ होती. त्यात २.४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील महिन्यातील मोटारींची विक्री हीआतापर्यंतची उच्चांकी मासिक विक्री ठरली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत २० लाख ७२ हजार ९५७ मोटारींची विक्री झाली आहे. पहिल्यांदाच सहामाहीत मोटारींच्या विक्रीने २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत १० लाख ७६ हजार मोटारींची विक्री झाली. Record sales of cars
