• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 October 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जीएसटी कपातीमुळे बाजारपेठेत विक्रमी तेजी

by Guhagar News
October 24, 2025
in Old News
37 0
0
Record rally in the market due to GST cut
72
SHARES
205
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.  24 : यंदा देशाच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. त्याशिवाय रशिया-युक्रेन, इस्राईल-इराण, भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष, वेगवेगळ्या देशांमध्ये लोकांनी रस्त्यावर येऊन सरकार उलथवल्याने ओढवलेले अराजक, अमेरिकेने सुरू केलेले टॅरिफ वॉर यासारख्या विविध घटकांमुळे गेले काही महिने जगभरच्या बाजारपेठांमध्ये मरगळलेले वातावरण आहे. परंतु, भारतातील बाजारपेठेत मात्र या उत्सवी काळात विक्रमी उलाढाल होत असलेली दिसते. त्यामुळे विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित अडथळे येऊनही भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत होताना दिसत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्सवी काळ सुरु होताना जीएसटी करदरांची नवी रचना जाहीर केली. त्यात अनेक वस्तू आणि सेवांवरील करदर कमी झाल्यामुळे ही मोठी तेजी दिसत आहे. Record rally in the market due to GST cut

यावर्षी दसरा-दिवाळीच्या उत्सवी काळात भारतात एकूण १,१५,००० कोटी रुपये म्हणजेच तब्बल $१३ अब्ज एवढी विक्रमी रक्कम केवळ ऑनलाइन माध्यमातून खर्च होण्याची शक्यता आहे असा अंदाज इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशनच्या (India Brand Equity Foundation – IBEF) अहवालात व्यक्त केला होता तो खरा ठरताना दिसत आहे. या सणासुदीच्या खरेदी-विक्री व्यवहारांपैकी जवळपास दोन-तृतीयांश व्यवहार फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या किरकोळ विक्रेत्यांकडून होण्याची अपेक्षा आहे. या महिन्याच्या सुरुवातीला यूगव्ह (YouGov) ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ५४ टक्के शहरी भारतीय या दिवाळीत विशेषत: मिठाई, कपडे आणि ॲक्सेसरीजवर अधिक खर्च करण्याची योजना आखत आहेत. Record rally in the market due to GST cut

रेपो दरातील कपात, वाढलेले खर्च करण्यायोग्य उत्पन्न, जीएसटी करदरातील कपात, विविध सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सुधारलेली ग्रामीण अर्थव्यवस्था आणि प्रलंबित मागणी यामुळे बाजारपेठेत तेजी आहे. Record rally in the market due to GST cut

या वर्षी, अमेझॉन इंडियाच्या अहवालानुसार द ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२५ ला २७६ कोटींहून (२.७६ अब्ज) अधिक ग्राहकांनी ऑनलाईन भेट दिली. त्यापैकी ७०% ग्राहक टियर २ आणि टियर ३ शहरांमधील होते. ग्राहकांनी स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीपासून ते साड्या, सजावटीचे सामान, सौंदर्य उत्पादने आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंपर्यंत सर्व काही खरेदी केले. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स, रत्नजडित दागदागिने आणि दुचाकी खरेदीचीही धूम होती. Record rally in the market due to GST cut

सणासुदीच्या दिवसांच्या सुरुवातीला म्हणजे श्रावण महिन्यात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने दागदागिन्यांचा खप कमी होऊन सराफी बाजारात मंदी आलेली होती. त्यामुळे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने सणासुदीच्या काळातील उलाढालीबाबत सावध अंदाज वर्तवला आहे. परंतु, अमेझॉन इंडियाचा अहवाल आणि बाजारपेठेतील वातावरण वेगळेच चित्र दर्शवत आहे. व्यावसायिकांच्या निरीक्षणानुसार अमेरिकेच्या टेरिफ वॉरमुळे सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने भाव कमी होण्याची वाट न पाहता खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. उत्तर भारतातील शहरी ग्राहक १८ कॅरेट सोन्याच्या खरेदीला प्राधान्य देत आहे, तर दक्षिण भारतात २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांनाच अद्याप पसंती टिकून आहे. Record rally in the market due to GST cut

मागील वर्षी, श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे एकाच वेळी २,५१२,५८५ एवढ्या विक्रमी संख्येने मातीचे दिवे (दिवा/दिवाळीचे दिवे) प्रज्वलित करण्यात आले होते. यावर्षी, अयोध्या सरयू नदीच्या घाटांवर त्याहून अधिक दिवे लावण्यासाठी सज्ज आहे. सुमारे ३०,००० स्वयंसेवकांच्या मदतीने, ५८ घाटांवर २.८ दशलक्ष (२८ लाख) दिवे लावण्याचे उद्दिष्ट आहे. सणासुदीच्या काळातील उत्साही वातावरणाचे हे देखील एक द्योतक आहे.

दिवाळीच्या काळात अनुकूल हवामान, सणामुळे सलग मिळणाऱ्या सुट्ट्या आणि उत्साही वातावरणामुळे लोक मोठ्या प्रमाणात सहलीवर जातात. सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, अगोडा (Agoda) या डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म कडील आकडेवारी दर्शवते की, सणाच्या आठवड्यासाठी देशांतर्गत सहलींच्या शोधात (domestic holiday searches) गेल्या वर्षाच्या तुलनेत १८ टक्के वाढ झाली आहे, तर परदेशा प्रवासाच्या स्वारस्यात ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. Record rally in the market due to GST cut

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRecord rally in the market due to GST cutटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share29SendTweet18
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.