• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नौदल कर्मचाऱ्यांचे मर्चंट नेव्हीमध्ये स्थित्यंतर

by Manoj Bavdhankar
June 23, 2022
in Bharat
16 0
0
Reconciliation agreement
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भारतीय नौदल आणि जहाजबांधणी महासंचालनालय यांच्यात सामंजस्य करार

नवी दिल्ली, ता. 22 : भारतीय नौदल (Indian Navy) आणि जहाजबांधणी महासंचालनालय  यांच्यादरम्यान 20 जून 2022 रोजी एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारामुळे, भारतीय नौदलातील कर्मचाऱ्यांना – कार्यरत आणि सेवानिवृत्त दोन्ही- मर्चंट नेव्हीमध्ये (Merchant Navy) स्थित्यंतर करता येणे शक्य होणार आहे. या सामंजस्य करारामुळे, भारतीय नौदलातील कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय STCW (खलाशांसाठी प्रशिक्षण, प्रमाणन आणि टेहळणीविषयक मानके) च्या दर्जाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.  जागतिक खलाशांमध्ये भारतीय खलाशांचे प्रमाण वाढवण्याच्या  पंतप्रधानांच्या अपेक्षेला अनुरूप असे हे पाऊल उचलण्यात आले आहे. नील अर्थव्यवस्थेसह, सागरी क्षेत्राला सरकारने दिलेले प्राधान्य लक्षात घेऊन, त्यासाठी कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याच्या दृष्टीनेही हा सामंजस्य करार उपयुक्त ठरणार आहे. Reconciliation agreement

या स्थित्यंतरासाठीची सविस्तर प्रक्रिया महासंचालनालयाने आपल्या आदेश 17 मध्ये जारी केली आहे. या आदेशानुसार, भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेली सागरी सेवा आणि अत्याधुनिक प्रशिक्षण लक्षात घेतले जाणार आहे. यात, भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांपासून ते नौसेनिकांपर्यन्त सर्व पदांवरील व्यक्तींचा विचार केला जाणार आहे. नॉटिकल म्हणजेच सागरी क्षेत्र आणि तंत्रज्ञान क्षेत्र अशा दोन्ही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा विचार केला जाईल.  या योजनेनुसार, नौदल कर्मचाऱ्यांना नौदल सेवेत असताना कार्यक्षमतेचे प्रमाणपत्र मिळेल. ही सुनिश्चित केले जाईल. या कर्मचाऱ्यांनी STCW च्या तरतुदींनुसार, काही अभ्यासक्रम, परीक्षा आणि मर्चंट नेव्हीत किमान सेवा दिल्यानंतर  हे प्रमाणपत्र, जागतिक पातळीवरही ग्राह्य धरले जाईल. Reconciliation agreement

Reconciliation agreement

भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांना मर्चंट नेव्हीत सुलभतेने स्थित्यंतर करता येईल. केवळ भारतातच नव्हे, तर जगभर त्यांना ही संधी उपलब्ध असेल.

ही स्थित्यंतर योजना, सविस्तर नियोजन आणि परिश्रमानंतर तयार केली गेली आहे. तसेच ती आखतांना, आंतरराष्ट्रीय नियमांसह अनेक घटक विचारात घेतल्या असून त्याच्याशी सुसंगत विविध तरतुदी सादर केल्या आहेत. यामुळे, भारतीय नौदलातील  कर्मचार्‍यांना मर्चंट नेव्हीमधील अगदी सर्वोच्च पदापर्यंत  नोकरी मिळवणे शक्य होणार आहे. नौदलात पुरेसा अनुभव घेतल्यानंतर नौदल  कर्मचारी आता नॉटिकल विषयक अमर्याद टन वजनाच्या परदेशी जाणाऱ्या जहाजांवर मास्टर्स म्हणून तसेच, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मुख्य अभियंता पदापर्यंत थेट सहभागी होऊ शकतील. Reconciliation agreement

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMarine areaMerchant NavyNaval StaffNavyNews in GuhagarReconciliation agreementSTCWटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजसागरी क्षेत्र
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.