श्रीपाद लेले, अलिबाग यांच्याकडून साभार
पहिली व्यक्ती होती, ॲड बळवंतराव मंत्री. बाळासाहेबांबरोबर व्यासपीठावर बसणारी प्रमुख व्यक्ती. मराठी माणसाचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी शिवसेनेचे बारसे करण्यापासून शिवसेनेची कायदेशीर घडी बसविण्याचे काम, बळवंतराव करत होते. मात्र पक्षांतर्गत लोकशाही असावी ह्या विचारावर त्यांचे मतभेद झाले आणि बळवंतराव शिवसेनेपासून वेगळे झाले. घरातील, गणगोतातील जाणती व्यक्ती संघटनेपासून दूर गेली. Rebel leaders of Shiv Sena
दुसरी प्रमुख व्यक्ती होती, अरूण मेहता. कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी म्हणून कामगार सेनेला मोठे करण्याचे काम अरुणभाईंनी केले होते. डावा विळखा सैल करण्यासाठी अनेक संस्था कारखाने यामध्ये पोहोचण्याचे आणि कामगारसेनेला अधिकृत युनियन म्हणून अरूण भाईंनी उभे केले. पण बाळासाहेबांचे मालकांबरोबरचे छुपे संबंध अरूण मेहतांना सहन न झाल्याने ते सेना सोडून दूर गेले. Rebel leaders of Shiv Sena
बंडू शिंगरे, हा धडाडीचा शिवसैनिक, शिवसेनेची जरब. पण काँग्रेसचे रामराव आदिकांना पाठिंबा देण्यावरून झालेल्या वादात बंडू शिंगरे दूर झाले, आणि प्रतिशिवसेनेचा केलेला प्रयत्न फसून गेला.
डॉ हेमचंद्र गुप्ते, शिवसेनेचे पहिले महापौर. मुंबईत मराठी मध्यमवर्गीय मनात शिवसेना रूजवण्याचे काम त्यांनी केले. पण बाळासाहेबांनी निवडणुकीत मुरली देवरा यांना दिलेल्या पाठिंब्यावरून बिनसले आणि गुप्ते वेगळे झाले. Rebel leaders of Shiv Sena
दत्ता प्रधान, ज्यांच्या संघटन कौशल्याने शिवसेनेची घडी बसली. शिवसेना शाखा, शाखा प्रमुख, जबाबदारी, तालुकाप्रमुख, जिल्हा प्रमुख, उपनेता अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर संघटना बनविली. कारण दत्ताजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. बेस्टमधील युनियन ही दत्ताजींची कामगिरी. शिवसेनेत दुसऱ्या स्थानावर बसलेले दत्ताजी अचानक 1977 वेगळे झाले.
त्यानंतरचीही दोन नावे घरातलीच!
माधव देशपांडे आणि राज ठाकरे, शिवसेनेत कर्तृत्व बहरत असतानाच दूर झालेली माणसे, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहेत. कारण पण एवढंच सांगेन, आज राजसाहेब शिवसेनेत असते. तर शिवसेना राष्ट्रीय पक्ष म्हणून केंद्रात जबाबदारीच्या जागेवर असती. मात्र स्वार्थाने ग्रासलेली संस्था किरकोळ विचारांच्या हातात गेली आणि वचनपूर्तीच्या नावावर महाराष्ट्राचे अव्वल स्थान घालवून बसली. वरील सर्व नावे बाळासाहेबांच्या गणगोतातील होती. जवळची होती तरीही ती दूर केली गेली. Rebel leaders of Shiv Sena
ह्यानंतर ची नावे शून्यातून निर्माण झालेली होती केवळ बाळासाहेब या परिस संपर्कात सोने झालेली. पण किरकोळ विचार आणि व्यक्ती वादातून दूर फेकली गेली. मात्र स्वतःच्या हिंमत्तीवर आजही राजकारणात तगून आहेत. Rebel leaders of Shiv Sena
पहिले गणेश नाईक, ज्यांचा शिवसेनेनंतर चा प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी वरून आज भाजपावर स्थिरावला आहे. नव्या मुंबईचा गड अजूनही राखून आहेत. दुसरे छगन भुजबळ, बाळासाहेबांवर व्यक्तीगत टिका करण्यासही मागेपुढे न बघणारे भुजबळ आज शिवसेना पक्षप्रमुखांच्या सोबत मंत्रीमंडळात राष्ट्रवादी कडून स्थान पटकावून आहेत. Rebel leaders of Shiv Sena
तिसरे नाव आहे, नारायण राणे. सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री पद भूषविलेला शिवसैनिक. शिवसेनेतून बाहेर पडला स्वतः चा पक्ष, काँग्रेस असा प्रवास करत भाजपामध्ये स्थिरावला, आज केंद्रीय मंत्री पद भूषवत आहेत. शिवसेने बरोबर टोकाचा विरोध असूनही बाळासाहेबांचे नाव आदराने घेणारे राणे कुटुंबीय वेगळेच आहेत. धर्मवीर आनंद दिघे हे नाव ही शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नाव. आध्यात्मिक बैठक, गोरगरीबांचा त्राता, मलंगगड अशा अनेक चळवळी आणि कार्यकर्ते उभा करणारा धर्मवीर एका अपघाताने अचानक दूर झाला. लोक काहीही बोलत असतील पण शिवसेनेवर आघातच होता. आज त्याचाच चेला बंड करून उभा आहे. खरं म्हटलं तर मविआ तयार होण्याच्या सुरूवातीलाच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या वर संशय व्यक्त केला होता. पण आपण युती म्हणून निवडून आलो, चर्चा न होताच युती तोडणे हे योग्य नाही या मताचे एकनाथ शिंदे वेगळे पडले आणि गेली अडीच वर्षे तोंडाला कुलूप लावून शिवसेनेतच नव्हे तर मंत्री पदीही चांगली कामगिरी करून आहेत. कर्तृत्ववान माणसे हे जास्त दिवस सहन करू शकत नाहीत. गेले पंधरा दिवस हेच घडत आहे. विधान परिषदेची निवडणूक लागल्यावर नियोजन बैठकीत समाविष्ट करून न घेणे, मुख्यमंत्र्यांच्या केबिनमधे प्रवेश न देणे. असा घोर अपमान सहन किती दिवस करणार. गेले अनेक महिने जे कधीतरी होईल असे वाटत होते, ते विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागत असताना घडले. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे निम्म्याहून अधिक आमदार आहेत. असे मात्र शिवसेनेच्या पक्ष प्रवासात प्रथमच घडत आहे. त्यामुळे शिवसेनेला अंतर्मुख होऊन विचार करायला लागणार आहे. Rebel leaders of Shiv Sena