श्रीकृष्ण खातू- सेवा नि. प्रा. शिक्षक
GUHAGAR NEWS : दुपारी शाळेच्या जेवणाची घंटा झाली. सर्व मुले जेवणासाठी सोडण्यात आली. शाळेत मध्यान्ह भोजन व्यवस्था असलेने सर्व मुलांनी आपआपले हात स्वच्छ धुवून, आपले ताट घेऊन पंगतीने जेवणासाठी बसली. नेहमी प्रमाणे पांचाळ काकी जेवण वाढायच्या. मुले श्लोक म्हणवून जेवणास सुरूवात करत असत. त्याप्रमाणे जेवण जेवूनही झाले. मुले जेवायला बसल्याशिवाय कोणत्याही शाळेत शिक्षक आपला डबा जेवायला बसत नाहीत. त्याप्रमाणे आम्हीही सहा शिक्षक सर्व मुलांनंतरच जेवायला बसत असू. आम्ही जेवणास सुरूवात करेपर्यंत मुलांचे मध्यान्ह भोजन व्हायचे. Realization of practicality through knowledge structure debate
असाच एक गुरूवारचा दिवस होता. आम्ही शिक्षक जेवायला सुरूवात करेपर्यंत मुलांचे जेवण झाले. व हात स्वच्छ धुवून मुले मोकळी झाली. कांहीं वेळाने मुलांचा गलबला, आरडाओरडा, ऐकायला आला. म्हणून आम्ही शिक्षक डबे अर्धवट ठेवून मुलांपर्यंत पोहोचलो. तर काय….. इयत्ता तिसरी शिकणारा विद्यार्थी राजवैभव पुढे व त्याच्या मागे सर्व मुले काही तरी चिडवत, चेष्टा करत चालली होती. असे चालू होते. Realization of practicality through knowledge structure debate
आम्ही तेथे जाताच सर्व गलबला एकदम थांबला. व मुलांना विचारले की काय झाले तुम्हाला ओरडायला? जेवण झाल्यावर थोडा वेळ शांत बसा. तेव्हा कळले की आज गुरूवारी जेवणानंतरचा पूरक आहार “केळी” पांचाळ काकींनी वाटप केला होता. आणि ती केळी खाऊन झाल्यावर त्या मुलांची केळीच्या साली प्रत्येक वर्गात जाऊन राजवैभव हा मुलगा खांद्याला पिशवी लावून जमा करत होता. केळी खाऊन झाल्यावर टाकाऊ असलेल्या केळीच्या साली राजवैभव जमा करत असलेली गोष्ट सर्व विद्यार्थ्यांना चेष्टेची वाटली. आणि म्हणून सर्व मुले त्याचा पाठलाग करून काही तरी हिणवत, चिडवत होती. शिक्षक तेथे गेल्यावर राजवैभव हा विद्यार्थी पुरता घाबरला. थरथरायला लागला. Realization of practicality through knowledge structure debate
मुलांना व त्याला वाटले होते की, गुरुजी आता याला काहीतरी किंवा कोणतीतरी शिक्षा करतील! राजवैभवला ऑफिसमध्ये बोलावून आणले. व मी शिक्षक म्हणून त्याची सखोल चौकशी केली. की राज वैभव हा प्रकार काय आहे? तू केळीच्या टाकलेल्या साली एवढ्या का जमवल्यास? कारण सत्तर मुलांची दोन केळी याप्रमाणे दुप्पट साली जमा केल्या होत्या. चौकशी करताना तू न घाबरता कारण सांग म्हटल्यावर, तो सांगू लागला. गुरुजी इयत्ता तिसरीच्या वर्गात विज्ञानाचा पाठ तुम्ही शिकवलात, त्यावेळी पाळीव प्राणी, प्राण्यांचा निवारा, प्राण्यांचे अन्न, प्राण्यांचे उपयोग हे सर्व तुम्ही शिकवले आहे. ते मी समजावून घेतले की, जर दूध देणाऱ्या गाई म्हशींना सुग्रास खाद्य दिल्यावर चांगले वाढीव दूध देतात. व त्या दुधाचा घरी व धंदा म्हणून चांगला उपयोग करता येईल. याकरता आमच्या घरात दूध देणारी म्हैस असल्याने घरातून माझ्या वडिलांनी सांगितल्यामुळे मी या केळीच्याही साली घरी घेऊन जायचे ठरवून, या जमा करून म्हशीच्या घमेल्यातील आंबोणातून खाऊ घातल्यास तीन ते चार दिवस या साली पुरतील. हे खाद्य दुभत्या म्हशीसाठी मला उपयुक्त वाटले. म्हणून गुरुजी मी केळीच्या साली खांद्याला लावलेल्या पिशवीतून घरी नेणार आहे. व दुभत्या म्हशीला खायला घालणार आहे. शिवाय या शाळेत अशा सालींपासून कचरा सुद्धा होणार नाही. एवढे बोलल्यावर माझा व इतर शिक्षकांचा राग व झालेला गैरसमज बाजूला झाला. लगेच सर्व मुलांना एका वर्गात एकत्र बसवले. त्यावेळी मुलांना मात्र वाटले की गुरुजी आता राज वैभवला नक्की मोठी शिक्षा करणारच! Realization of practicality through knowledge structure debate
पण वर्गात सर्व विद्यार्थ्यांसमोर राज वैभवला बोलावून उभा केला. व त्याने विज्ञानाच्या पाठातून घेतलेले ज्ञान, त्याची रचना म्हणजे ज्ञानरचनावाद! यातून व्यवहारिकतेची त्याला झालेली स्व जाणीव! Realization of practicality through knowledge structure debate
अशाप्रकारे गाई, म्हशी या प्राण्याना पोषक खाद्य दिल्यास त्यांच्यापासून आपल्याला उपयोगी पडणारे दूध मिळते. यातून प्राण्यांबद्दलची आपुलकी, प्रेम, प्राणीमात्रावर दया करणे, इत्यादी गोष्टी आपोआप समजतात.. त्यांचा शेण खतासाठी उपयोग होतो. दुधाच्या पैशाने आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार व मदत नक्की होते. म्हणजेच राज वैभव शिकलेल्या ज्ञानरचना वादातून एक सुंदर व्यावहारिकतेची स्व जाणीव( स्वतःला झालेली जाणीव) आहे. हेच खरे आपल्या अभ्यासक्रमातील योग्य फलित आहे. आपल्या शिक्षण विभाग व महाराष्ट्र शासनाला हेच अपेक्षित असून एका गोष्टीतून किंवा एका उदाहरणातून अनेक ज्ञानाच्या रचना रचून विद्यार्थी घडावेत. हाच दृष्टिकोन आहे. असे समजावून सांगून सर्वांकडून टाळ्या वाजवून राज वैभवचा गौरव करण्यात आला. व शाबासकी देण्यात आली. लगेचच राजवैभवचा चेहरा एकदम खुलला! व सगळा वर्ग चिडीचीप झाला. असे गुण विद्यार्थ्यांमधून शोधल्यास नक्कीच नवीन रचना करणारे ज्ञानरचनावादी विद्यार्थी सापडतील, यात मुळीच शंका नाही. Realization of practicality through knowledge structure debate