• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीच्या महीला संघाची उपांत्य फेरीत धडक

by Manoj Bavdhankar
November 7, 2022
in Sports
19 1
1
In Kho-Kho Number of players increase

In Kho-Kho Number of players increase

38
SHARES
109
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राज्य खो-खो स्पर्धा : पुणे विरुध्द रत्नागिरी सामना रंगणार

हिंगोली : तिसर्‍या दिवशीच्या झालेल्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात रत्नागिरीच्या महीला संघाने सांगलीचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. Ratnagiri  Women’s team reached in semi-final पुरुष गटात ठाणे विरुध्द पुणे आणि मुं. उपनगर विरुध्द सांगली तर महिलांमध्ये पुणे विरुध्द रत्नागिरी आणि उस्मानाबाद विरुध्द ठाणे उपांत्य फेरीत लढणार आहेत.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने हिंगोली जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली तालुका खो-खो असोसिएशन आयोजित ५८ वी पुरुष व महिला राज्य अंजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा रामलिला मैदानात सुरू आहे. महिला गटात उपांत्यपूर्व सामन्यात चुरशीच्या सामन्यामध्ये रत्नागिरीने सांगलीचा ३ गुणांनी (१०-७) पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मध्यंतराला रत्नागिरीकडे २ गुणांची आघाडी होती. ती आघाडी सांगली संघाला मोडता आली नाही. विजयी रत्नागिरी संघातर्फे अपेक्षा सुतार (२.१०, २.२० मि. संरक्षण  आणि ४ गुण), आरती कांबळे (२.२०, २.१० मि. संरक्षण व २ गुण), ऐश्‍वर्या सावंत (२.५० मि. संरक्षण), श्रेया सनगरे (२.१० मि. संरक्षण व २ गुण) तर पल्लवी सनगले (१.४०, नाबाद १.२० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. सांगलीतर्फे प्रतिक्षा बिराजदार (२.१०, १.५० मि. संरक्षण व १ गुण), साक्षी पाटील (२.१० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी पराभव टाळण्यासाठी प्रयत्न केला. Ratnagiri  Women’s team reached in semi-final

महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात उस्मानाबादने मुंबईचा एक डाव १२ गुण (१७-५) पराभव केला. उस्मानाबादतर्फे अश्‍विनी शिंदे (३ मि. संरक्षण व ३ गुण), संपदा मोरे (३ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी तर मुंबईतर्फे मानसी आंबोकरने (१ मि. संरक्षण) चांगला खेळ केला. महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात ठाणेने सोलापूरवर १० गुणांनी (२१-११) मात केली. ठाणेतर्फे रुपाली बडे (३.१०, २.१० मि. संरक्षण), गितांजली नरसाळे (१.४० मि. संरक्षण), पुजा फरगडे (५ गुण) यांनी चांगला खेळ केला. महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याने नाशिकचा १ डाव ५ गुणांनी (११-६) धुव्वा उडवल. पुण्यातर्फे प्रियांका इंगळेने (३.२० मि. संरक्षण व ६ गुण), स्नेहल जाधव (३ मि. संरक्षण) यांनी चमकदार कामगिरी केली. Ratnagiri  Women’s team reached in semi-final

पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात ठाण्याने मुंबईचा १५-१४ असा १ गुण आणि ८ मिनिटे राखून विजय मिळवला. गजानन शेंगाळ (१.१०, १.३० मि. संरक्षण व ३ गुण), संकेत कदम (१.३०, १.२० मि. संरक्षण व २ गुण), लक्ष्मण गवस (१.५०, १ मि. संरक्षण व १ गुण) यांची चमकदार कामगिरी करत विजयात मोलाची कामगिरी केली. मुंबईतर्फे विश्‍वजित कांबळे (१.३० मि. संरक्षण व १ गुण), वेदांत देसाई (४ गुण) यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई उपनगरने नाशिकचा १४-९ असा १ डाव ५ गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे अनिकेत चंदवणकर (३, १.५० मि. संरक्षण), अक्षय भांगरे (३ मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ केला. पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात सांगलीने सोलापूर १५-१३ असा दोन गुण आणि आठ मिनिटे राखून पराभव केल. विजय संघातर्फे सुरज लांडे (२, १.४० मि. संरक्षण व २ गुण), अक्षय मासल (१.१०, १.३० मि. संरक्षण व 3 गुण) यांनी तर सोलापूरतर्फे अक्षय इंगळे (1.10 मि. संरक्षण) चांगला खेळ केला. पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याने उस्मानाबादचा १२-१० असा २ गुण आणि ७ मि. राखून पराभव केला. पुणे तर्फे आदित्य गणपूळे (२,२ मि. संरक्षण व १ गुण ), प्रतिक वायकरने (१.१०, २, मि. संरक्षण व २ गुण ) चांगला खेळ करत विजय मिळवून दिला. उस्मानाबादतर्फे विजय वसावेने (१.१४, १.१० व १ गुण) चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. Ratnagiri  Women’s team reached in semi-final

Tags : Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Ratnagiri  Women’s team reached in semi-final, Kho Kho, sports,

Tags: GuhagarGuhagar NewsKho KhoLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRatnagiri  Women's team reached in semi-finalsportsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet10
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.