एमटीडीसी फायद्यात; 2021-22 या आर्थिक वर्षात कोकण आघाडीवर
गुहागर, ता. 29 : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर पर्यटकांचा कोकणात य़ेण्याचा कल वाढत आहे. त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) रिसाँर्टला झाला आहे. रत्नागिरी, सिधुदुर्गमधील पाचही रिसाँर्ट मार्च महिन्यात वीस दिवस तर एप्रिल महिन्यात दहा दिवस फुल होती. संपूर्ण महाराष्ट्र रत्नागिरी एमटीडीसी अव्वल आहे, अले कोकण विभागीय पर्यटन अधिकारी अँड. दिपक माने यांनी सांगितले. Ratnagiri, Sidhudurg crowd of tourists


कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या दोन वर्षाच्या कालावधीत रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यातील एमटीडीसीची सर्वच रिसाँर्ट फुल होती. त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रावर झाला आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात पर्यटनात कोकण विभाग आघाडीवर राहिला आहे. दोन्ही जिल्ह्यातील एमटीडीसीच्या निवासस्थानाला पर्यटनाला सर्वाधिक पसंती दिली आहे. गणपतीपुळे एमटीडीसी निवासस्थानात उरलेल्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. हळूहळू वाढत आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली रिसाँर्ट 95 टक्के बुकिंग झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर, गणपतीपुळे रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, सिधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, कुणकेश्वर येथे एमटीडीसी सुंदर रिसाँर्ट आहेत. दर्जेदार हाँटेल्ससह सुंदर भोजनाची व्यवस्था पर्यटकांना भुरळ पाडत आहेत. यामुळेच कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत आहे. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. उच्चभ्रुच नव्हे तर मध्यम वर्गियांमकडून वातानुकूलित आणि सर्वसाधारण खोल्यांसाठी प्रतिसाद मिळत आहे. या व्यतिरिक्त उर्वरित दिवस 70 टक्के खोल्या फुल्ल होत्या. Ratnagiri, Sidhudurg crowd of tourists


मेचे आरक्षण 70 टक्के पूर्ण
शाळा महाविद्यालयासह शासकीय कार्यालयानांही सुट्ट्या आहेत. त्यामुळे पर्यटकांकडून कोकणाला पहिली पसंती मिळू लागली असून, मेसाठीचे 70 टक्के आरक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित येत्या काही दिवसात होईल. वातानुकूलिनसाठी पंचवीस हजार रूपयांपासून दहा हजार रूपयांपर्यंत खोल्या आहेत. तर सर्वसाधारण खोल्यांचे एक दिवसाचे दोन हजार भाडे आकारले जाते. एमटीडीसीने पँनरोमा काँटेज ही नवी संकल्पना राबविली असून दहा हजार रूपयांपर्यंत दर ठेवले आहेत. Ratnagiri, Sidhudurg crowd of tourists


216 खोल्या 30 दिवस फुल्ल
गणपतीपुळेत 110 खोल्या, वेळणेश्वर 18 खोल्या, हरिहरेश्वर 22 खोल्या, तारकर्ली 28 खोल्या, कुणकेश्वरला 38 खोल्या आहेत. मार्चमध्ये सरासरी 20 दिवस या सर्व खोल्या फुल्ल होत्या. तर एप्रिलमध्ये पहिल्या पंधरवड्यातील 10 दिवस फुल्ल होत्या. Ratnagiri, Sidhudurg crowd of tourists