रत्नागिरी, ता. 17 : रत्नागिरी पॅसेंजर (Konkan railway) पूवीप्रमाणेच दादरहून सोडून संगमेश्वर, चिपळूण व खेडसाठी राखीव अनारक्षित डबे पूर्ववत करावेत, अशी मागणी मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये राहणार्या कोकणवासीय प्रवासी जनतेकडून करण्यात आली आहे. यासाठी रेल्वेविषयक अभ्यासक अक्षय महापदी (Railway scholar, Akshay Mahapadi) यांनी रेल्वेला निवेदन दिले आहे. Ratnagiri passenger should continue as before
यामध्ये रेल्वेने 50104 रत्नागिरी दिवा पॅसेंजरला (Konkan railway) काही आरक्षित डबे द्यावेत तसेच संगमेश्वर, चिपळूण, खेड येथे उघडणारे अनारक्षित डबे पूर्ववत करावेत व महाड (वीर स्थानक) व माणगाव तालुक्यांना देखील प्रत्येकी एक अनारक्षित डबा राखीव ठेवावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे अक्षय महापदी, कळवा (ठाणे) यांनी केली आहे. याच्या प्रती त्यांनी पाठपुरव्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister of State Raosaheb Danve), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane), खा. सुनील तटकरे (Min. Sunil Tatkare), खा. विनायक राऊत (Min. Vinayak Raut), आ. योगेश कदम (MLA Yogesh Kadam), आ. शेखर निकम (MLA Shekhar Nikam), आ. भरतशेठ गोगावले (MLA Bharatsheth Gogavale), ना. अनिल परब (Anil Parab), ना. आदितीताई तटकरे (Adititai Tatkare), विरोधी पक्षनतेने प्रवीण दरेकर (Praveen Darekar from Opposition) यांना दिल्या आहेत. Ratnagiri passenger should continue as before
पूर्वीची गाडी क्र. 50104/50103 रत्नागिरी – दादर पॅसेंजरची ( Konkan railway) आता रत्नागिरी दिवा पॅसेंजर झाली आहे. कोविड (Covid) पूर्व काळात रत्नागिरी दादर पॅसेंजरला (Dadar Ratnagiri Passenger) दोन आरक्षित डबे होते तसेच संगमेश्वर, चिपळूण व खेड येथे प्रत्येकी एक अनारक्षित डबा उघडत असे. रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांतून मुंबईकडे जाणार्या गाड्यांमध्ये चढणे हे अद्यापही एक दिव्यच आहे. गाड्या संबंधित स्थानकांत पोहोचण्याआधीच गर्दीने ओसंडून वाहत असल्यामुळे आरक्षण असूनही एखाद्याला आपली आरक्षित जागा मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे, येथील प्रवाशांना त्या त्या स्थानकात उघडणार्या अनारक्षित डब्यांचा मोठा आधार होता. परंतु आता आरक्षणही नाही आणि हक्काचे अनारक्षित डबेही नाहीत अशी येथील प्रवाशांची व्यथा आहे. कोरोनानंतर सर्व गाड्या पूर्ववत झाल्यानंतरही कोकण रेल्वेने वरील सुविधा अद्याप पूर्ववत केलेल्या नाहीत. ही गाडी कोरोना काळात दिव्यावरुन रत्नागिरीसाठी सोडली जात नसल्याने मुंबईतील मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये राहणार्या प्रवासी जनतेला ही गाडी पकडून कोकण गाठणे अत्यंत गैरसोयीचे झाले आहे. Ratnagiri passenger should continue as before
कोकण रेल्वेच्या (Konkan railway) सुरुवातीच्या काळात दिवा वीर व पुढे दिवा खेड गाडी चालत असे. ज्या स्थानकांनी आणि प्रवाशांनी खर्या अर्थाने कोकण रेल्वेचे उद्घाटन केले त्या माणगाव, महाड, खेड तालुक्यातील प्रवाशांची आजची स्थिती दयनीय आहे. दादर चिपळूण गाडीची मागणी अद्यापही पूर्ण केली जात नाही. याबाबत प्रवासी जनतेच्या वतीने अक्षय मधुकर महापदी, कळवा (ठाणे) यांनी दादर रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत चालवली जावी, यासाठी निवेदन दिले आहे. Ratnagiri passenger should continue as before