• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खूनातील संशयित अटकेत

by Guhagar News
June 14, 2022
in Ratnagiri
22 1
0
Thief arrested in 10 minutes
44
SHARES
125
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी शहर पोलिसांचे अधिक्षकांनी केले कौतुक

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर येथे दिनांक 06 जून 2022 रोजी तरुणावर तलवारीने वार करुन त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीसांना आज मंगळवार दिनांक 14/06/2022 रोजी तिघांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे .अटक केलेल्या तिनही आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मा. न्यायालयाने दिले आहेत. (Ratnagiri Murder)

रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर येथे दि. 06 जून 2022 रोजी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र शिवाजी विटकर या तरुणावर दोघांनी तलवारीने वार करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा भाऊ रविंद्र शिवाजी विटकर यांने शहर पोलीस स्थानकात गुरुनाथ उर्फ गोट्या नाचणकर याच्यासह दोघांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरुन रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन येथे गुरुनाथ नाचणकर याच्यासह त्याच्या साथिदारावर गु.र.नं.231/2022 भादंवि कलम 307, 34 , भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 नुसार गुन्हा दाखल केला होता.

Ratnagiri Murder Case

मा.पोलीस अधीक्षक डॉ . मोहितकुमार गर्ग यांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी विशेष पथकाची स्थापना केली होती व त्यांना आरोपी अटकेबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या. पोलीस पथक आरोपी गुरुनाथ नाचणकरसह त्याच्या साथिदाराचा शोध घेत असतानाच मंगळवारी सकाळी गुरुनाथ नाचणकर हा आपल्या साथिदारासह माळनाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी माळनाका परिसरात शहर पोलीसांचे पथक सापळा लावून होते. याच वेळी गुरुनाथ नाचणकर आपल्या साथिदारासह माळनाका येथे आला असता पोलीस पथकाने त्या दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर, गुरुनाथ नाचणकर हा गुन्हा घडल्यानंतर सौरभ अर्जून सावंत (रा. सुपलवाडी , नाचणे ) याच्याकडे आश्रयाला असल्याचे पुढे आले. गुरुनाथ व त्याच्या साथिदाराने गंभीर गुन्हा केला आहे व पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, हे माहित असताना सुद्धा गुन्हेगाराला आश्रय दिल्याच्या आरोपाखाली सौरभ सावंत यालाही अटक करण्यात आली आहे. या तिघांनाही मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. Ratnagiri Murder Case

पोलीस अधीक्षक डॉ .मोहितकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई , उपविभागिय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाले, पोलीस उपनिरिक्षक आकाश साळुंखे , अंमलदार प्रविण बर्गे, आशिष भालेकर, गणेश सावंत, नंदू सावंत, वैभव नार्वेकर, प्रविण पाटील, अमोल भोसले,विलास जाधव, राहुल घोरपडे, अमित पालवे, निलेश कांबळे , उदय वाजे, कामेरकर, देवसकर यांनी ही कामगिरी केली.
गंभीर गुन्ह्यातील संशयीत आरोपींना अटक करणा-या पोलीस पथकाचे मा. पोलीस अधीक्षक डॉ .मोहितकुमार गर्ग यांनी अभिनंदन केले आहे. Ratnagiri Murder Case

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRatnagiri Murder Caseटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet11
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.