सीसीटीव्हीद्वारे पोलीसांनी घेतला शोध
मुंबई, ता. 16 : मुंबईतील एका उपनगरात चक्क उंदराने 10 तोळे सोन पळवले (Rat clutches Gold) होते. दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यावर पोलीसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले. तेव्हा एका कचराकुंडीजवळील गटारात सोन्याचे दागिने (Gold jewelry) सापडले. 5 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोलीसांनी शोधुन काढल्याबद्दल पोलीसांचे (Mumbai Police) कौतूक होत आहे. सुंदरी पलानीवेल यांनी 15 जूनला दिंडोशी पोलीस ठाण्यात सोन्याचे दागिने हरवल्याची तक्रार नोंदवली होती.
सोन्याचे दागिने हरवले
गोकुळधाम कॉलनीमध्ये रहाणाऱ्या सुंदरी पलानीवेल या महिलेने आपल्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्याकरीता घरातील सोन्याचे दागिने (Gold jewelry) बँकेत ठेवण्यासाठी सुंदरी पलानीवेल निघाल्या होत्या. बँकेत जात असताना त्यांना वाटते रामनगर येथे भिक्षेकरी महिला आणि तिचा मुलगा भेटला. माणुसकीच्या नात्याने सुंदरी पलानीवेल यांनी दोन वडापाव असलेली पिशवी या भिक्षेकऱ्यांना दिली आणि त्या बँकेत निघून गेल्या. बँकेत गहाण ठेवण्यासाठी त्या दागिन्यांची पिशवी शोधु लागल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, भिक्षेकऱ्यांना वडापावची पिशवी दिली त्यातच दागिने ठेवले होते. आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या तातडीने भिक्षेकरी महिलेला शोधण्यासाठी रामनगरला आल्या. मात्र तिथे त्यांना भिक्षेकरी महिला आणि मुलगा दिसला नाही. आता आपले दागिने मिळाले नाहीतर घरी काय उत्तर द्यायचे. प्रचंड तणावाखाली असलेल्या पलानीवेल यांनी थेट दिंडोशी पोलीस ठाणे गाठले. 10 तोळे सोन्याचे दागिने हरविल्याची तक्रार दिली. घटनाक्रम सांगितला. (Rat clutches Gold)


पोलीसांची तत्परता
दिंडोशी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक चंद्रकांत घार्गे (Mumbai Police) यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तपासाला सुरवात केली. घटनास्थळाजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज पाहिले. त्यात भिक्षेकरी महिला आणि मुलगा दिसला. पोलीसांनी त्यांना शोधुन काढले. आता दागिन्यांचा शोध लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलीसांनी भिक्षेकरी महिला आणि मुलाची चौकशी केली. तेव्हा दोन्ही वडापाव शिळे होते. पाव कडक झाले होते. म्हणून आम्ही ते खाल्लेच नाहीत. महिलेनी दिलेली पिशवी वडापावसह कचराकुंडीत फेकून दिली. असे भिक्षेकरी मुलाने सांगितले. लागलीच पोलीस कचराकुंडीशी आले आणि फेकून दिलेली पिशवी शोधु लागले. मात्र पोलीसांना पिशवी मिळाली नाही. पुन्हा एकदा सोन्याचे दागिने (Gold jewelry) कुठे गेले असतील हा प्रश्र्न निर्माण झाला.


उंदीराने पळवले सोने (Rat clutches Gold)
कचराकुंडीत टाकलेली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी (Gold jewelry) कोणी घेतली असेल याचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी (Mumbai Police) पुन्हा सीसीटीव्ही फुटेल बारकाईने पहाण्यास सुरवात केली. तेव्हा कचराकुंडीतील ती पिशवी एक उंदीर घेवून पळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा उंदीर ही पिशवी घेवून कचराकुंडीजवळील गटारात गेल्याचे सीसीटीव्ही फूटेजवरुन समजले. मग पोलीसांनी गटारात शोध घेतला. तेव्हा पोलीसांना ती पिशवी सापडली. (Rat clutches Gold)
सुंदरीला मिळाले दागिने
या पिशवीमध्ये 3 सोनसाखळ्या, कानातल्यांचे 2 जोड आणि 4 अंगठ्या असा एकूण मिळून 10 तोळे सोन्याचा ऐवज होता. ज्याची बाजारभावाप्रमाणे 5 लाख रुपये इतकी किंमत आहे. 16 जूनला पोलीसांनी (Mumbai Police) सुंदरी पलानीवेल यांना दिंडोशी पोलीस ठाण्यात बोलावले. दागिन्यांची ओळख पटवली. त्यानंतर सर्व सोन्याचे दागिने (Gold jewelry) पलानीवेल यांना दिले.

