• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तेजोमय प्रवास

by Guhagar News
October 1, 2025
in Old News
47 0
0
Rashtriya Swayamsevak Sangh travel
91
SHARES
261
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 विचारांचा वटवृक्ष — राष्ट्रनिर्मितीची अदृश्य शक्ती

गुहागर, न्यूज : २७ सप्टेंबर १९२५ हा काही साधा दिवस नव्हता. त्या दिवशी नागपूरच्या एका छोट्याशा खोलीत एक महान संकल्प जन्माला आला. स्वातंत्र्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारताला, आत्मभान देणाऱ्या नवजागरणाचं बीज पेरलं गेलं. आणि त्या बीजाचं नाव होतं. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ”

डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी त्या दिवशी लावलेलं हे रोपटं, आज शंभर वर्ष पूर्ण करत आहे. संघ आज विचारांचा, संस्कारांचा आणि राष्ट्रभक्तीचा वटवृक्ष बनला आहे. याची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली, आणि फांद्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत विस्तारलेल्या आहेत. Rashtriya Swayamsevak Sangh travel

Rashtriya Swayamsevak Sangh travel

त्या काळातला भारत… आणि हेडगेवारांचा संकल्प

१९२५ चा भारत गुलामीच्या अंधःकारात बुडालेला. परकीय सत्तेने देशाच्या केवळ भूमीवर नव्हे, तर मानसावरही कब्जा केला होता. जात, धर्म, भाषा, प्रांत या भिंतींनी समाज विखुरलेला होता. देश स्वतंत्र व्हावा ही केवळ राजकीय मागणी नव्हती; ती होती आत्म्याच्या मुक्तीची हाक. अशा काळात डॉ. हेडगेवारांनी जाणलं.  “जोवर समाज संघटित होत नाही, तोवर स्वातंत्र्य केवळ कागदावर राहील.” त्यांच्या या विचारातूनच जन्माला आली राष्ट्रचेतनेची चळवळ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

संघाच्या स्थापनेची प्रेरणा

डॉ. हेडगेवार हे काँग्रेस चळवळीत सक्रिय होते. असहकार आंदोलनात सहभाग घेताना त्यांना जाणवलं. फक्त आंदोलनांनी समाज बदलत नाही; बदलासाठी हवी असते चारित्र्यनिर्मिती, संघटनशक्ती आणि राष्ट्रीयत्वाची भावना. म्हणूनच त्यांनी राजकारणाऐवजी संस्कारकारणाचा मार्ग निवडला. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, २७ सप्टेंबर १९२५ रोजी, संघाची स्थापना झाली. Rashtriya Swayamsevak Sangh travel

Rashtriya Swayamsevak Sangh travel

संघाचं वैशिष्ट्य : शिस्त, संघटन आणि संस्कार

संघाने कोणतीही राजकीय भूमिका घेतली नाही. त्याचं काम होतं. समाजातील प्रत्येक घटकाला “स्वयंसेवक” बनवणं, जो समाज, राष्ट्र, धर्म आणि संस्कृतीसाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करेल. या उद्दिष्टासाठी संघाने निवडलं एक अद्वितीय माध्यम, शाखा. मैदानावर दररोज एकत्र येऊन खेळ, व्यायाम, देशभक्तीपर गीतं, बौद्धिक सत्रं यांतून घडू लागली एक नव्या विचारांची, शिस्तबद्ध आणि सेवा-minded पिढी. शाखांमध्ये कोणतंही पद, पैसा, राजकारण नव्हतं. फक्त कार्य, शिस्त आणि त्यागभावना होती.

संघाचा विस्तार : वटवृक्षाच्या रूपात

प्रारंभी केवळ काही स्वयंसेवक असलेला संघ, आज देशाच्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात कार्यरत आहे. १९४० नंतर गुरुजी गोळवलकर यांच्या काळात संघाला वैचारिक खोली आणि राष्ट्रीय दृष्टिकोन लाभला. त्यांनी संघाला दिलं ध्येय “राष्ट्रीय पुनरनिर्माण.” आज संघाशी प्रेरणा घेणाऱ्या संस्थांची संख्या हजारोंमध्ये आहे —

 विद्यार्थी क्षेत्रात : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP)
 कामगार क्षेत्रात : भारतीय मजूर संघ
 सेवा क्षेत्रात : सेवा भारती

Rashtriya Swayamsevak Sangh travel

महिला, आदिवासी, शिक्षण, ग्रामीण विकास, विज्ञान, पर्यावरण, आरोग्य, उद्योजकता, संस्कृती प्रत्येक क्षेत्रात संघ प्रेरित कार्य सुरु आहे. संघ आता संस्था नाही, तो एक चळवळ आहे. संघाने समाजाला दिलं एक विलक्षण माध्यम — शाखा. ना कागद, ना करार, ना सभागृह…फक्त मैदानावरचा सूर्यप्रकाश, वंदनगीतांची स्वरलहर, शिस्तीची ओळ, आणि राष्ट्रभक्तीचा उन्मेष. इथे कोणी मोठं-लहान नाही, ब्राह्मण-शूद्र नाही, श्रीमंत-गरीब नाही. फक्त एकच ओळख असते “मी हिंदू, मी भारतीय, मी स्वयंसेवक.” Rashtriya Swayamsevak Sangh travel

या शाखांमधून घडले चारित्र्यवान युवक, निःस्वार्थ कार्यकर्ते, आणि राष्ट्रासाठी समर्पित नागरिक. संघ हा केवळ संघटनात्मक ढाचा नाही, तो आहे एक सजीव विचारप्रवाह, जो समाजात सेवा शिकवतो,  संस्कृतीशी नातं जोडतो, आणि राष्ट्राशी एकात्मतेचं बंधन निर्माण करतो. “संघ दिसत नाही, पण संघाची ऊर्जा समाजाच्या प्रत्येक श्वासात जाणवते.”

विरोध आणि गैरसमज : संघाचा धैर्यपूर्ण प्रवास

संघावर टीका झाली. आरोप झाले. कधी ‘सांप्रदायिकते’चा ठपका, तर कधी ‘राजकीय हेतूंचा’ संशय. पण संघाचं उत्तर नेहमी एकच  “आमचं काम जोडण्याचं आहे, तोडण्याचं नाही.” १९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघावर लावलेली बंदी, झालेल्या चौकशा या सर्वांचा शेवट एका सत्यावर झाला : संघ निर्दोष आहे. या घटनांनी संघाच्या कार्यकर्त्यांच्या मनात भीती नव्हे, तर निर्धार निर्माण केला.

आजचा संघ : अदृश्य हात, दृश्यमान परिवर्तन

आजचा संघ, काळानुसार आधुनिक होत असतानाही, आपल्या संस्कारधारेत कार्यरत आहे. त्याचं स्वरूप न बदलता, त्याने कार्याचा विस्तार केला आहे.

ग्रामीण भागात — ग्रामविकास प्रकल्प
शहरांमध्ये — स्वच्छता अभियान
तरुणांसाठी — राष्ट्रीय पुनरुत्थान कार्यशाळा
सर्वत्र — सेवा, शिक्षण आणि स्वावलंबनाचे उपक्रम

संघ आज आधुनिक भारताचा मूक शिल्पकार आहे. राजकारणापासून दूर राहूनही, राष्ट्रघडणीच्या प्रत्येक पायरीवर त्याचं मूक योगदान आहे. Rashtriya Swayamsevak Sangh travel

Rashtriya Swayamsevak Sangh travel

टीकेचं स्वागत — आत्मपरीक्षणाची ताकद

संघावर झालेल्या टीका संघाने कधीच शत्रुत्वाने घेतल्या नाहीत. उलट, त्यांना आत्मपरीक्षणाचा आरसा मानलं. महिलांचा अधिक सहभाग त्यासाठी राष्ट्रसेवा समिती, अल्पसंख्याकांशी संवाद, समावेशकतेचा आग्रह या सर्व विषयांवर संघ सातत्याने काम करत आहे. कारण संघाचा हेतू आहे  “संपूर्ण समाजाचं एकात्मिक उन्नयन.”

संघ म्हणजे राष्ट्राचा आत्मा

एका छोट्या खोलीत १९२५ ला सुरू झालेलं हे कार्य,आज अब्जावधी लोकांच्या मनात चेतना निर्माण करतंय. संघ सांगतो “राष्ट्र हेच आमचं देवस्थान, आणि समाजसेवा हीच आमची पूजा.” डॉ. हेडगेवारांचा संकल्प आजही प्रत्येक स्वयंसेवकाच्या श्वासात जिवंत आहे. तो श्वास सांगतो “माझं जीवन माझ्यासाठी नाही. ते राष्ट्रासाठी आहे.”

संघ हा राजकीय प्रवास नाही, तो संस्कारांचा संन्यास आहे.
संघ हा संघर्षाचा मार्ग नाही, तो सेवेचा संकल्प आहे.
विचारांचा शतक, संस्कारांचा प्रवास

संघाच्या स्थापनेपासून आजवरचा प्रवास म्हणजे विचार, संस्कार, शिस्त आणि राष्ट्रभक्तीचा अखंड महायज्ञ. तो अजून संपलेला नाही तो दररोज प्रत्येक स्वयंसेवकाच्या पावलांनी पुढे चाललाय. “संघ आहे म्हणून राष्ट्र आहे, राष्ट्र आहे म्हणून आपण आहोत.” Rashtriya Swayamsevak Sangh travel

Tags: 100 years of RssGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRashtriya Swayamsevak Sangh travelटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share36SendTweet23
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.