सिम्बॉयसीस संस्थेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व जिवंत स्वरूपात
पुणे, ता.7 : देशातील तरुणांना प्रोत्सहित करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी सिम्बॉयसीस संस्थेच्यावतीने पुणे येथे बाबासाहेबांच्या संग्रहालयाच्या माध्यमातून “प्रेरणाभूमी” ची स्थापना करण्यात आली आहे. हे संग्रहालय उभारून सिम्बॉयसीस संस्थेने समाजासाठी महत्वपूर्ण असे योगदान दिले आहे. संपूर्ण खडकाळ अश्या या परिसरात वृक्षवल्ली फुलवण्याचे काम सिम्बॉयसीसने यशस्वीरीत्या केले आहे. या होलोग्रामच्या निर्मितीमुळे आज जिवंत स्वरूपात बाबासाहेबांचे दर्शन आपल्याला होते आहे. त्यांच्या संपुर्ण शरीराची हालचाल, डोळे हे सर्व पाहून जणू बाबासाहेब प्रत्यक्षात आपल्या समोर उभे असल्याचा भास होतो आहे. असे डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले. Rare experience possible due to hologram


या संग्रहालयाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सिम्बॉयसीस संस्थेला सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी दिले. सिम्बॉयसीस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक यावर्षी “रौप्य महोत्सवी” वर्ष साजरे करत आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होलोग्रामचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या उद्घाटन समारंभासाठी डॉ. वीरेंद्र कुमार यांना “प्रमुख्य अतिथी” म्हणून आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, यांना “सन्माननीय अतिथी” म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. Rare experience possible due to hologram


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते की समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचली पाहिजे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कार्य करीत आहे, असे डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व वस्तूंचे जतन सिम्बॉयसीस संस्थने उत्तमरीत्या केले आहे. आज नव्या पिढीसाठी बाबासाहेबांच्या वस्तूंबरोबरच त्यांच्या विचारांचा वारसा हा सिम्बॉयसीस संस्थेने समोर ठेवला आहे. संपूर्ण खडकाळ अश्या या परिसरात वृक्षवल्ली फुलवण्याचे काम सिम्बॉयसीसने यशस्वीरीत्या केले आहे. या होलोग्रामच्या निर्मितीमुळे आज जिवंत स्वरूपात बाबासाहेबांचे दर्शन आपल्याला होते आहे. त्यांच्या संपुर्ण शरीराची हालचाल, डोळे हे सर्व पाहून जणू बाबासाहेब प्रत्यक्षात आपल्या समोर उभे असल्याचा भास होतो आहे. असे डॉ. वीरेंद्र कुमार पुढे बोलताना म्हणाले. Rare experience possible due to hologram
कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले म्हणाले कि, सिम्बॉयसीस हे संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. मी आजपर्यंत अनेक वेळा सिम्बॉयसीस ला भेट दिलेली आहे.
सिम्बॉयसीसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. .बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकच्या मानद संचालिका सौ. संजीवनी मुजुमदार, सिम्बॉयसीसच्या प्रधान संचालिका डॉ.विद्या केयेरवडेकर आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. Rare experience possible due to hologram


आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. मुजुमदार म्हणाले कि, सिम्बॉयसीस तर्फे उभारण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या या संग्रहालय व स्मारकाच्या निर्मितीत अनेकांनी महत्वपूर्ण असे योगदान दिले आहे. त्यात प्रामुख्याने रामदास आठवले, नानासाहेब गोरे व एस एम जोशी यांचा समावेश आहे. या संग्रहालयातील बाबासाहेबांचा स्पर्श झालेल्या वस्तू आपल्याला एक प्रेरणा देतात म्हणूनच या वास्तू ला प्रेरणा भूमी असे नाव देण्यात आले आहे. Rare experience possible due to hologram
सिंबायोसिस संग्रहालय व स्मारकातील थ्रीडी होलोग्राम भारताच्या संसदेत उभे असलेले डॉ. आंबेडकर यांच्या जीवनमानाचा होलोग्राम पाहण्याचा दुर्मिळ अनुभव आपल्याला देतो.
होलोग्राम विषयी
C-DAC, पुणेच्या ह्युमन-सेंट्रेड डिझाईन अँड कॉम्प्युटिंग ग्रुपने सिंबायोसिस संस्थेत 3D होलोग्राफी तंत्रज्ञानाची स्थापना करण्यात मदत केली आणि होलोग्राफिक प्रोजेक्शनसाठी डॉ. आंबेडकरांचे 3D मॉडेल विकसित केले. C-DAC च्या HCDC ग्रुपने डॉ. आंबेडकरांच्या मूळ भाषणानुसार चेहऱ्यावरील हावभाव, हावभाव आणि ओठ-सिंक्रोनाइझेशनसाठी 3D मॉडेल अॅनिमेटेड केले. होलोग्राफिक डिस्प्ले तंत्रज्ञान आपल्या सभोवतालची समान जागा सामायिक करताना भौतिक वस्तू किंवा व्यक्ती उभे राहून कार्य करत असल्याचा भ्रम निर्माण करते. Rare experience possible due to hologram