अरुण मुळ्ये, कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई जयंती
रत्नागिरी : मेरी झांसी नही दूंगी अशी गर्जना करत इंग्रजांशी युद्ध करून वीरमरण आलेल्या राणी लक्ष्मीबाईंनी Rani Lakshmibai प्रतिकूल स्थितीत भारतीयांना प्रेरणा, प्रोत्साहन दिले. त्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजी आणि युद्धाचे शिक्षण घेतले व त्यात त्या तरबेज झाल्या. या राणी लक्ष्मीबाईंचा Rani Lakshmibai आदर्श मुलींनी समोर ठेवला पाहिजे. आजच्या समाजातही मुली, युवतींसमोर अनेक आव्हाने उभी असतात. त्यावर मात करण्यासाठी युवतींनी कौशल्ये आत्मसात करावीत, असे प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापक अरुण मुळ्ये यांनी केले. राणी लक्ष्मीबाईंचे स्मारक होणार असून ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले. Rani Lakshmibai Jayanti

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पानवळ घवाळीवाडी येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेत राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त (Rani Lakshmibai Jayanti) अभिवादन कार्यक्रम, व्याख्यान व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, शाळा समिती अध्यक्ष रामेश्वर लिंगायत, उपसरपंच रवींद्र मांडवकर, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे कार्यकारिणी सदस्य दिलीप ढवळे, मानस देसाई, प्रतिभा प्रभुदेसाई, सचिव शिल्पा पळसुलेदेसाई, शिक्षिका मंजिरी गुणे आदी मान्यवर उपस्थित होते. Rani Lakshmibai Jayanti
या वेळी संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी सांगितले की, गेली पाच वर्षे राणी लक्ष्मीबाईंची जयंती गावातील शाळेत जाऊन कार्यक्रम आयोजित करत आहोत. यामुळे राणी लक्ष्मीबाईंचे राष्ट्रकार्य व देशभक्ती पोहोचवत आहोत. ग्रामीण भागातील शाळाही चांगले उपक्रम राबवत आहेत. त्यांनाही प्रोत्साहन मिळते असे सांगून त्यांनी घवाळीवाडी शाळेकरिता ५ हजार रुपयांची मदत त्वरित सुपुर्द केली. Rani Lakshmibai Jayanti
मुख्याध्यापिका स्मिता मुळ्ये यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाईंची मोठी फोटोफ्रेम, राणीच्या संक्षिप्त जीवनचरित्राची पुस्तके व विद्यार्थ्यांना पुस्तके, रोख रक्कम व शाळेला २५०० रुपयांची शालोपयोगी पुस्तके दिली. शिक्षिका समीक्षा माळवदे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक प्रदीप मोरे यांनी आभार मानले. या वेळी शिक्षक काशिनाथ तांबे, मनोज जुवेकर यांच्यासमवेत विद्यार्थी उपस्थित होते. Rani Lakshmibai Jayanti

विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त Rani Lakshmibai Jayanti जि. प. पानवळ घवाळीवाडी पूर्ण प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या स्पर्धांतील विजेते. (प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने)
मोठा गट- निबंध स्पर्धा- रिया घवाळी, स्वस्तिक कांबळे, अंतरा कांबळे. वक्तृत्व- अंतरा कांबळे, स्वस्तिक कांबळे, क्षितिजा मांडवकर. चित्रकला- प्रेम घवाळी, सुजल मांडवकर, आर्यन आंबेकर. संगीतखुर्ची- प्रेम घवाळी, संस्कार मांडवकर, गौरव घवाळी. लंगडी- सुजल मांडवकर, अथर्व तांबे, आर्यन आंबेकर. लहान गट- निबंध- श्रुती घवाळी, पद्मश्री लिंगायत, प्रांजल शिंदे. वक्तृत्व- पद्मश्री लिंगायत, पूजा घवाळी, निधी घवाळी. चित्रकला- गौरव घवाळी, मानस कांबळे, सिद्धार्थ घवाळी. संगीतखुर्ची- स्वराली घवाळी, नुपूर तांबे, पूजा घवाळी. लंगडी- अदिती आंबेकर, माऊली घवाळी, दुर्वा मांडवकर. Rani Lakshmibai Jayanti
