• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात रंगभुमी दिन साजरा

by Mayuresh Patnakar
November 7, 2023
in Guhagar
98 1
1
Rangbhumi Day is celebrated in Guhagar
193
SHARES
550
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नटराजाचे पूजन करुन नांदी म्हणून रंगभुमीला मानवंदना

गुहागर, ता. 07 : मराठी रंगभुमी दिनानिमित्त कलाविकास नाट्यसंस्थेचे पदाधिकारी आणि नाट्य कलाकारांनी नटराजाचे पूजन केले. त्यानंतर सर्वांनी सामुहिक नांदी म्हणून मराठी रंगभुमीसाठी झटणाऱ्या सर्वांना मानवंदना दिली. Rangbhumi Day is celebrated in Guhagar

गुहागर तालुक्यामध्ये आजही अनेक ठिकाणी नाट्यकला जोपासण्याचे काम स्थानिक कलाकार करत आहेत. मराठी रंगभुमीवरील अनेक संगीत नाटकांना स्वरांकित करणारे पं. गोविंदराव पटवर्धन हे गुहागरचे. त्यामुळे गुहागर शहराला तर संगीत नाटकांची अनेक वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी येथील नाट्य कलाकार आणि नाट्यरसिक प्रयत्नरत असतात. शहरातील कलाविकास नाट्यसंस्था ही दरवर्षी संगीत नाटकांचा प्रयोग बसवून त्यांचे राज्य नाट्य स्पर्धेत तसेच गुहागरातील विविध ठिकाणी सादरीकरण करत असते. कलाविकास नाट्य संस्थेच्या अनेक कलाकारांना राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिकेही मिळाली आहेत. त्यामुळे मराठी रंगभुमीशी इथल्या नाट्य कलाकारांचे अतूट नाते आहे. दरवर्षी मराठी रंगभुमी दिनाच्या निमित्ताने शहरातील कलाकार एकत्र येवून रंगभुमीला, मराठी नाट्य कलाकारांना मानवंदना देत असतात. Rangbhumi Day is celebrated in Guhagar

यावर्षी मराठी रंगभुमी दिनी गुहागरमधील कलाकार संजय सावरकरांच्या घरी जमले. कलाविकास संस्थेतील  ज्येष्ठ  पदाधिकारी आणि नाटकातील पदे बसवुन घेणारे अरुण परचुरे सर यांनी नटराजाचे व ऑर्गनचे पूजन केले. त्यानंतर चिन्मय सावरकर, वैभव सावरकर, संजय कानिटकर, केदार परचुरे, संजय सावरकर, सौ. सुविधा ओक, कृपाल परचुरे, सौ. गिरीजा भिडे, कु. शलाका भिडे, विवेक गानू, सौ. वैशाली गानू, सौ. स्नेहा परचुरे, सौ. वल्लरी खरे, कु. तेजस तांबे, कु. प्रियांका तांबे, सौ. संपदा पाटणकर व प्रकाश तांबे, सौ. रोहिणी सावरकर आदी कलाकारांनी सामुहिक नांदी आणि संगीत नाटकातील पदे म्हटली. आमच्याकडून रंगभुमीची, नटराजाची सेवा सातत्याने घडावी, अशी प्रार्थना केली. Rangbhumi Day is celebrated in Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRangbhumi Day is celebrated in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share77SendTweet48
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.