Outstanding work in Algebraic Geometry and Commutative Algebra
दिल्ली, दि. 23 : कोलकाता येथील भारतीय सांख्यिकी संस्थेतील प्राध्यापिका नीना गुप्ता यांना 22 फेब्रुवारी 2022 ला झालेल्या आभासी समारंभात वर्ष 2021चा युवा गणितज्ञासाठीचा रामानुजन पुरस्कार प्रदान करण्यात आला. अफाइन अल्जेब्रिक जॉमेट्री आणि कम्युटेटिव्ह अल्जेब्रा या विषयांतील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. Outstanding work in Algebraic Geometry and Commutative Algebra


विकसनशील देशामध्ये उल्लेखनीय संशोधन कार्य करणाऱ्या 45 वर्षांहून कमी वय असलेल्या तरुण गणितज्ञाला (Young mathematician) हा पुरस्कार दिला जातो.
अल्जेब्रिक जॉमेट्री या विषयातील मुलभूत समस्या असलेल्या झरीस्की कॅन्सलेशन या समस्येची उकल करणाऱ्या प्राध्यापिका नीना गुप्ता यांनी शोधलेल्या उत्तराने त्यांना 2014 या वर्षीचा भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार मिळवून दिला होता.


सचिव आणि विभागातर्फे गुप्ता यांचे अभिनंदन करताना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे प्रमुख संजीव वर्शनी म्हणाले की, महिला संशोधकाला दिलेल्या या पुरस्कारामुळे जगभरातील महिला संशोधकांना गणित हा विषय त्यांचे करियर म्हणून निवडण्यास प्रोत्साहन मिळेल. Outstanding work in Algebraic Geometry and Commutative Algebra
आयसीटीपी अर्थात आंतरराष्ट्रीय थीऑरॉटीकल फिजिक्स केंद्र (International Center for Theoretical Physics) आणि आंतरराष्ट्रीय गणित युनियन (International Mathematical Union) आणि भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रायोजित हा पुरस्कार दर वर्षी विकसनशील देशातील संशोधकाला देण्यात येतो. Outstanding work in Algebraic Geometry and Commutative Algebra


The Ramanujan Prize for Young Mathematicians was awarded to Professor Neena Gupta, a mathematician of the Indian Statistical Institute in Kolkata, in a virtual ceremony on 22nd February 2022.
Professor Gupta’s solution for solving the Zariski cancellation problem, a fundamental problem in Algebraic Geometry, earned her the 2014 Young Scientists Award of the Indian National Science Academy (NSA). The NSA described her solution as ‘one of the best works in algebraic geometry in recent years done anywhere’

